leopard esakal
ग्लोबल

Viral Video : गेंड्याची शिकार करुन बिबट्या चढला झाडावर

सोशल मीडियावर तुम्ही वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर तुम्ही वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. 'जंगलाचा राजा' सिंह आणि वाघ, बिबट्याचे व्हिडिओ सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि लाईकही केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ बिबट्याशी जोडलेला आहे.

या व्हिडीओमध्ये एक बिबट्या (Leopard) स्वत:पेक्षा जड असलेल्या गेंड्याची शिकार करतो आणि नंतर त्याला तोंडात दाबून झाडावर चढतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे डोळे उघडेच राहतील. बिबट्याने आपल्या जबड्यात असा गेंडा पकडलेला आहे की जसा काय तो एखादा लहान हरीणच आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, बिबट्या आपल्या मजबूत जबड्याने गेंड्याला पकडतो आणि मजबूत पंज्यांच्या सहाय्याने वेगाने झाडावर चढतोय.

व्हिडिओ पाहता बिबट्याने आधीच गेंड्याला ठार मारल्याचं दिसतंय. यानंतर तो मृत शरीर घेऊन खाण्यासाठी झाडावर चढतो. कदाचित दुसरा प्राणी आपली शिकार हिसकावून घेईल, अशी भीती बिबट्याला वाटत असावी. वाइल्ड अॅनिमल शॉर्ट्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदाचा हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 1,30,000 हून अधिक लोकांनी पाहिला असून लाइक केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने कमेंटमध्ये लिहिले की, "व्हिडिओमध्ये बिबट्याच्या जबड्याची ताकद पाहून मला आश्चर्य वाटले." आणखी एका युझरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, "यामुळे बिबट्याला जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हटले जाते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT