America-and-Taliban
America-and-Taliban 
ग्लोबल

अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार

वृत्तसंस्था

दोहा, काबूल - अमेरिका आणि तालिबानी दहशतवाद्यांची संघटना यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारावर आज कतारची राजधानी दोहा येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार पुढील १४ महिन्यांत अमेरिका आपले सर्व सैनिक अफगाणिस्तानातून माघारी बोलविणार असून, त्यामुळे अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. 

अमेरिकेचे विशेष दूत जाल्मे खलीलजाद आणि तालिबानचा राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो उपस्थित होते. 

आज झालेल्या कारारामुळे अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबान यांच्यातील संवाद सुरू होणार असून, त्याला यश आल्यास मागील अठरा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबण्यास मदत मिळणार आहे. 

या करारापूर्वीच्या चर्चेत तालिबानच्या वतीने मुल्ला बरादार आणि अमेरिकेतर्फे खलीलजाद यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात आले. दोहा येथील अलिशान हॉटेलमधील कक्षात या दोन्ही नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करार झाल्यानंतर उपस्थितांनी उत्साहात घोषणा दिल्या, त्याचवेळी खलीलजाद आणि बरादार यांनी हस्तांदोलन केले. 

तालिबानने अल कायदा या दहशतवादी संघटनेबरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याची अट अमेरिकेकडून घालण्यात आली आहे. दोहा येथे शांतता करार झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाण नागरिकांचे अभिनंदन केले आहे. या करारामुळे नव्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची संधी अफगाण नागरिकांना मिळाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील वाटाघाटींमध्ये अफगाणिस्तान सरकारचा थेट सहभाग नव्हता. त्यामुळे शांतता करारानंतर अफगाणिस्तानातील परिस्थितीत नेमका काय फरक पडेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. आज झालेल्या करारावेळी भारताचे कतारमधील राजदूत पी. कुमारन हेदेखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT