according to Ayurveda balance-your doshas during summer  
health-fitness-wellness

Balance The Diet: गोड, कडू, तुरट या चवी उन्हाळ्यातील आहारात का महत्वाच्या?

वात, पित्त आणि कफ हे दोष आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारे कार्य करतात

सकाळ डिजिटल टीम

आपले शरीर आणि मनात पाच प्रमुख घटकांनी बनलेली जैविक उर्जा आहे. जी पाच इंद्रिये आणि सूक्ष्म क्रियांशी जोडली गेली आहे. शरीरातील दोष हे शारीरिक, शरीरविज्ञानशास्त्र, मानसिक आणि भावनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतात. तसेच हे आपल्या संपूर्ण आरोग्यावर नियंत्रण ठेवतात. आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ हे दोष आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारे कार्य करतात. या 'दोषां'मध्ये कोणतेही असंतुलन निर्माण झाले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या काळात आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.

सध्या उन्हाळा भरपूर आहे. अशावेळी बाहेरच्या प्रखर उष्णतेमुळे आपले शरीर आतूनही गरम राहते. त्यामुळे पित्त आणि वात दोन्ही 'दोष' वाढतात. या काळात, आपली पचनशक्ती आणि उत्साह कमी असतो. उन्हाळ्यात अनेकांचे पित्त खूप वाढते. किंबहुना पित्त वाढवणारा ऋतू म्हणूनही उन्हाळा ओळखला जातो. त्यामुळे पित्त शांत करणारे पदार्थ या काळात खाल्ले पाहिजेत. त्यासाठी थंड, द्रव, गोड, ओलसर आणि कमी तेलकट पदार्थ खावेत. तर, मसालेदार, गरम, आंबट किंवा खारट पदार्थ खाणे टाळावे. उन्हाळ्यात दूध, तूप, नैसर्गिक गोड पदार्थ, नारळपाणी, जिरे पाणी, भात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

These 4 Foods have High Protein lentils

गोड, कडू आणि तुरट अशा पदार्थांद्वारे उन्हाळ्यात पित्त दोषावर नियंत्रण ठेवता येते. दूध, भाज्या, धान्ये, ताजे दही आणि इतर नैसर्गिक गोड पदार्थ पित्त कमी करण्यासाठी अथिशय चांगले आहेत. या पदार्थांव्यतिरिक्त kale, डार्क चॉकलेट आणि जिरे, कडुलिंबाची पाने, हळद आणि इतर मसाले यांचा समावेश होतो. कडू चवही शरीराला खूप फायद्याची आहे. कडू पदार्थ रक्तासाठी चांगले असतात. ते तहान भागवतात, भूक संतुलित करतात, पचनाला मदत करतात आणि अतिरिक्त पित्त शोषून घेतात. बीन्स, फळे, भाज्या, सफरचंद, बेरी, ब्रोकोली आणि इतर क्रूसीफेरस भाज्या या त्यासाठी चांगल्या आहेत. शिवाय उन्हाळ्यातील ताण कमी करण्यासाठीही या भाज्यांचा फायदा होतो.

उन्हाळ्यात आपण वर सांगितलेले खाद्यपदार्थ आपण खाल्ले पाहिजे. पण त्यातले काही पदार्थ खाऊन काही लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांनी मिरची, कांदे, मसालेदार पदार्थ, मसाले यासारखे पदार्थ टाळावेत किंवा मर्यादित ठेवावेत. आंबवलेले पदार्थ, द्राक्षे, अननस आणि पोटात जळजळ करणारे पदार्थही खाणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT