health-fitness-wellness

प्रोसेस्ड फूडचं भरपूर सेवन करताय? स्मृतीवर होऊ शकतो परिणाम : Study

विनायक होगाडे

वॉशिंग्टन : अनेक लोकांना तेलकट, मसालेदार आणि भरपूर प्रक्रिया केलेलं अन्न खाण्याची सवय असते. अशा प्रकारचे बहुतांश पदार्थ हे पॅकेज्ड स्वरुपातच बाजारात मिळतात. असे अन्न पदार्थ खाण्याची चटकच या लोकांच्या जीभेला लागलेली असते. मात्र, ही चटक तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे माहितीय का? या सवयीचा परिणाम थेट तुमच्या मेंदूवर होऊ शकतो. एका नवीन अभ्यासात असं आढळून आलंय की, खूप प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या (highly processed food) सेवनाचा माणसाच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो. सलग चार आठवडे एका उंदरांवर यासंदर्भातला प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामध्ये आढळलं की, खूप प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या सेवनामुळे त्याच्या मेंदूत तीव्र प्रतिक्रिया (inflammatory response in the brains) निर्माण होते, ज्यामुळे स्मरणशक्ती (memory loss) कमी होण्याची शक्यता दिसून आली.

संशोधकांना असंही आढळलंय की, प्रक्रिया केलेल्या आहारासह जर ओमेगा -3 फॅटी ऍसिड डीएचए चा पुरवठा केल्यास या प्रकारच्या स्मृतीसंबंधीच्या समस्या टाळता येतात. वयस्कर उंदरांवर केलेल्या या प्रयोगामध्ये मेंदूतील दाहक प्रभाव कमी होताना दिसून आला. ब्रेन, बिहेवियर आणि इम्यूनिटी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालंय. खूप प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन केलेल्या तरुण प्रौढ उंदरांमध्ये न्यूरोइनफ्लेमेशन आणि कॉग्निटीव्ह समस्या आढळून आल्या नाहीत.

उंदरांवर केल्या गेलेल्या या अभ्यासामध्ये ready-to-eat मानवी पदार्थांचीच नक्कल करण्यात आली. हे खाद्य त्या उंदरांना देण्यात आलं. हे खाद्यपदार्थ अधिक काळ टिकून रहावेत म्हणून सामान्यत: पॅक केले जातात. उदा. जसे की बटाटा चिप्स आणि इतर स्नॅक्स, पास्ता डिश आणि पिझ्झा, मीट इत्यादी.

लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या मूळाशी देखील उच्च प्रक्रिया केलेले आहारच असतात. विस्मरणाचा परिणाम होऊ नये यासाठी सॅल्मन सारख्या डीएचए घटकांनी युक्त अशा अन्नपदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करावा, असे संशोधक म्हणतात. विशेषत: वृद्धांच्या मेंदूला होणाऱ्या हानीचा विचार करता हे योग्य ठरेल, असं हा चार आठवड्यांचा अभ्यास स्पष्ट करतो.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर बिहेवियरल मेडिसीन रिसर्चचे संशोधक आणि मानसोपचार आणि वर्तणुकीशी संबंधित आरोग्याचे सहयोगी प्राध्यापक रूथ बॅरिएन्टोस म्हणाले, "आम्ही केलेल्या अभ्यासातून हे हानीकारक परिणाम इतक्या लवकर दिसून आले की, ही गोष्ट थोडी चिंताजनक आहे."

"या अभ्यासातील हे निष्कर्ष सूचित करतात की प्रक्रिया केलेल्या आहाराचा अधिक वापर करण्यामुळे आपल्या मेंदूवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. तसेच आपल्याला अचानक विस्मरणाचा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे वृद्ध लोकसंख्येमध्ये, जलद गतीने विस्मरण होणे, अल्झायमर रोगासारख्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह रोगांची लक्षणे तातडीने दिसून येणे, यासारख्या परिणामांची शक्यता असते. हे पाहता आता आपल्या आहारात अधिक प्रक्रिया केलेलं अन्नाचा समावेश कमी करणे आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड डीएचएने समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर वाढववे योग्य ठरेल. जेणेकरून हा धोका आपल्याला टाळता येईल अथवा कमी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT