blood pressure
blood pressure esakal
health-fitness-wellness

ब्लड प्रेशरच्या प्रत्येक रुग्णाला 7 गोष्टी माहिती असायलाच हव्यात

सकाळ डिजिटल टीम

हायपरटेंशनला हाय ब्लड प्रेशर म्हणून देखील ओळखले जाते.

सध्या धावपळीच्या जीवनात सुरु असलेला तणाव आणि अनियमित लाइफस्टाइल (Lifestyle) हे आज हायपरटेन्शनसाठी जबाबदार असलेल्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. हायपरटेंशनला हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) म्हणून देखील ओळखले जाते. ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, जी सायलेंट किलरसारखे काम करते. कारण हे हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्योर, स्ट्रोक आणि अंधत्वाचा धोका वाढविण्याचे कार्य करते. ज्यामुळे दरवर्षी जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या मते, हृदयाच्या समस्या आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी रक्तदाब वाढण्यापासून रोखणे खूप महत्वाचे आहे. ज्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.

काय आहे उच्च रक्तदाबाचा त्रास-

उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये धमनीच्या भिंतीविरूद्ध रक्ताची शक्ती खूप जास्त असते. सामान्यत: जेव्हा रक्तदाब 140/90 च्या वर असतो तेव्हा त्याला हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब म्हणतात.जर रक्तदाब 180/120 पेक्षा जास्त असेल तर ही स्थिती गंभीर मानली जाते.

हायपरटेन्शनच्या रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्यावी-

- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी पोषक तत्वयुक्त पदार्थ खावेत.फळे व भाज्या नियमित खाव्यात.

- मीठाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. एका दिवसाच्या आहारात 5 ते 6 ग्रॅम मीठाचं नियमित सेवन करावं.

- ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आहारात बटाटे, संत्री, मनुका, द्राक्षे यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे, यामुळे सोडियमचा प्रभाव पडतो आणि ब्लड प्रेशर कमी होऊ लागतो.

- ब्लड प्रेशर बहुधा अशा लोकांमध्ये असतो ज्यांचे वजन देखील जास्त असते. अशावेळी रक्तदाबाचा त्रास टाळण्यासाठी रोज व्यायाम करा.

- ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी पालक,केळी,दही आणि बदाम यासारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

- नियमितपणे कमीतकमी १५ मिनिटे ब्रिक्स वॉक करा.

- उच्च रक्तदाब असलेले रुग्ण जंक फूड,अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन टाळतात.

- नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) च्या मते, जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका जाणवत असेल तर त्याने नियमितपणे रक्तदाब तपासणी केली पाहिजे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT