women diet  esakal
health-fitness-wellness

महिलांनो, वयानुसार आहारात करा 'असा' बदल, साठीनंतर राहाल फिट!

महिलांनी तंदुरूस्त आणि फिट राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

महिलांनी तंदुरूस्त आणि फिट राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. साठीनंतर स्वत:ला सुदृढ ठेवणे जास्त गरजेचे असते. अशावेळी पोषण तत्वांवर लक्ष देणे गरजेचे आहे. जसजसे वय वाढते तशी आपल्या शरीरात (Body) पोषकतत्वांची कमतरता दिसून येते. त्यामुळे सांधेदुखी, उच्च रक्तदाब, तसेच आरोग्यविषयक (Health) इतर समस्या उद्धभवात. तरूणवयात गोड, मसालेदार आणि जंक फूड खाल्ले जाऊ शकते. पण, वृद्धापकाळात असे पदार्थ शरीरासाठी योग्य नसतात. त्यामुळे वयानुसार महिलांचा आहार (Food) कसा असावा, हे माहिती असणे गरजेचे आहे.

teenage fv food

अल्पवयीन मुली- अल्पवयीन मुलींच्या शारीरिक- मानसिक विकासासाठी शरीराला अधिक पोषण मूल्यांची गरज असते. अशावेळी पौष्टीक आहार हा प्राधान्य असणे गरजेचे आहे. या वयात शरीरातील आवश्यक घटकांच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे असंतुलन होण्याचा धोका असतो. जो शरीरातील अनेक कार्यांसाठी जबाबदार असतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अनियमित पाळी हे याचे सर्वात मोठे लक्षण आहे. तसेच हिमोग्लोबीनही कमी होते. त्यामुळे अल्पवयीन मुलींनी आहारात लोह आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जास्त साखर, मीठ, जंक फूड तसेच सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाणे टाळावे.

Foods That Are High in Vitamin C

तिशीतल्या स्त्रीया- तुमचे वय तीस वर्षांपेक्षा कमी असेल तर तुमच्या शरीरासाठी कॅल्शियमचे संतुलन राखणे गरजेचे असून हीच योग्य वेळ आहे. त्यासाछई तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीने समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. जर गरोदर असाल किंवा स्तनपान करत असाल तर आहारात व्हिटॅमिन सी, लोह आणि लीन प्रोटीन्स घेतले पाहिजे. जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल, तर तुम्ही व्हिटॅमिन डी, बी12, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध आहार घ्यावा. या वयात महिलांनी संतुलित आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, मसूर, सीफूड आणि फळे खाणे गरजेचे आहे.

कडधान्य

४० ते ५० वयोगटातील महिला- चाळीशी, पंन्नाशी जवळ आलेल्या महिलांनी कॅल्शिअम, आर्यन आणि बेरी, कोको, ग्रीन टी यांसारखे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ खावेत. याशिवाय या वयात फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. त्यात संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारची फळे असतात. या वयात व्हिटॅमिन बी 12 कडे दुर्लक्ष करू नये कारण ते योग्य न्यूरोलॉजिकल फंक्शन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नाद्वारे जीवनसत्व बर्‍याच वेळा मिळत नाहीत. तुम्ही यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकता. साधारणपणे या वयात चयापचय मंदावतो, जीवनसत्त्वांचीही कमतरता असते, त्यामुळे कमी ग्लायसेमिक, कमी चरबीयुक्त, जास्त प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. यासोबतच दररोज व्यायाम करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT