Shower At Night 
health-fitness-wellness

उन्हाळ्यात रात्री आंघोळ केल्याने होतात 5 फायदे

सध्या उन्हाळा प्रचंड वाढला आहे

सकाळ डिजिटल टीम

उष्णता प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी तर तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. उन्हाळ्यात अनेक गोष्टी बदलतात. कपड्यांपासून खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. तर काही लोकं दोनदा आंघोळ करतात. पूर्ण दिवसभर शरीरात धूळ साठलेली असते. तसेच घामही खूप येतो. शरीराचे तापमानही वाढलेले असते. अशावेळी तापमान कमी करण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी संध्याकाळी आंघोळ करणं गरजेचं आहे. पण काही लोकं तब्येतीमुळे संध्याकाळी आंघोळ करू नये असं म्हणतात. पण असं काही नसत. उलट उन्हाळ्यात संध्याकाळी किंवा रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच आरोग्याच्या समस्याही कमी होऊ शकता..

हे होतात फायदे

१) त्वचा स्वच्छ होते- दिवसभर शरीरावर जमलेले किटाणू रात्री आंघोळ केल्याने मरून जातात. तसेच बॅक्टेरियाचे संक्रमण आणि त्वचेच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यामुळे रात्री झोपही चांगली लागते. सकाळी ताजेतवाने वाटते.

२) तणाव होतो दूर- लोक दिवसभर ऑफिसला जातात. संध्याकाळी घरी येतात. अशावेळी पूर्ण दिवसाचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी रात्री आंघोळ केली पाहिजे. त्यामुळे तुमचा थकवा तर दूर होईलच शिवाय तणावही कमी होईल. रात्री आंघोळ केल्याने मेंदू चांगल्या प्रकारे कार्यन्वित होतो. जर तुम्ही पाण्यात तेल घालून आंघोळ केली तर तुम्हाल आणखी फ्रेश वाटू शकेल. तसेच मन शांत राहील.

Shower At Night

३) वजन कमी करण्यासाठी फायद्याचे - रात्री आंघोळ केल्याने वजन कमी होते. त्याचबरोबर मायग्रेन, शरीरदुखी, सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यात संध्याकाळी आणि रात्री अंघोळ करावी.

४) उच्च रक्तदाब नियंत्रित होतो- उष्णता खूप वाढल्यावर शरीराचे तापमानही खूप वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच रात्री रक्ताभिसरणही चांगले राहते.

५) मूड फ्रेश राहतो- रात्री आंघोळ केल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होते. तसेच शरीरावरील ताण रात्री आंघोळ केल्याने दूर होतो. म्हणूनच सकाळी जरी आंघोळ केलीत तरी रात्री आंघोळ करायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT