Is Too Much Coffee Bad For Your Heart: बदलत्या कामाच्या वेळा, वाढता ताण यामुळे बरेचजण दिवसभर जास्तीत जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करतात. त्यातही कॉफीचे सेवन करणारे लोक जास्त आहेत. परंतु कॉफी किंवा कॅफीनचा नियमित वापर केल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.
जर दिवसातून ३ ते ४ पेक्षा जास्त कप कॉफी घेतली, तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. कॅफीन हा एक प्रकारचा उत्तेजक पदार्थ आहे, जो मेंदूला अॅक्टिव्ह करतो, हृदयाची धडधड वाढवतो आणि रक्तदाब वाढवतो. याशिवाय, कॅफीन किडन्यांवरही परिणाम करतो. तो शरीरात जास्त लघवी तयार करतो ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी बाहेर टाकले जाते, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. कॅफीन फक्त कॉफीतच नव्हे तर चहा, चॉकलेट्स आणि अनेक ऊर्जा देणाऱ्या ड्रिंक्समध्येही असतो.
दररोज ३०० ते ४०० मिग्रॅ. कॅफीन म्हणजे साधारणपणे ४ ते ५ कप कॉफी एवढे प्रमाण सुरक्षित मानले जाते. पण लहान मुलांनी, गरोदर बायकांनी आणि बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी कॉफी शक्यतो टाळावी. कारण कॅफीन घेतल्यावर हृदयाचा ठोका वेगाने वाढतो आणि रक्तदाबही जास्त होतो. त्यामुळे अशा काळात सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
ज्यांना उच्च रक्तदाब आहे आणि जे त्यावर औषधे घेत आहेत, त्यांनी कॉफी प्यायल्यावर २ ते ३ तासांनी आपला रक्तदाब मोजावा. कारण कॅफीन घेतल्यानंतर लगेच मोजल्यास रक्तदाब चुकीचा दाखवला जाऊ शकतो. काही लोकांना हृदयाची धडधड वारंवार जाणवते, ज्यात हृदयाचा ठोका १०० पेक्षा जास्त असतो, अशा त्रासाला अरिदमिया म्हणतात.
- डॉ. रुचित शाह, कार्डिओलॉजिस्ट, सैफी हॉस्पिटल
जास्त कॅफीन घेतल्यावर हृदयाची धडधड वाढते आणि हृदय जास्त जोरात आकुंचन करू लागते. हे सर्व सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीममुळे होते. काही वेळा यामुळे अॅरिदमिया (अनियमित हृदयाचे ठोके) जसे की एट्रियल फिब्रिलेशन होऊ शकतात. ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा इतर हृदयाचे आजार आहेत, त्यांना हे धोके अधिक असतात.
- डॉ. अजीत मेनन, कार्डियाक सायन्सेस, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
ज्यांना अशा प्रकारचे हृदयाचे त्रास आहेत, त्यांनी दिवसाला एक कप पेक्षाही कमी कॉफी प्यावी. डिकॅफ कॉफी (कॅफीनशिवाय कॉफी) घेतली तरी काही विशेष त्रास होत नाही, फक्त सुरुवातीला थोडी डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटणे असे होऊ शकते. पण नंतर शरीराला याची सवय होते.
कॅफीनवर सवय लागू न देणं चांगलं. आणि जर सवय लागली असेल, तर हळूहळू कमी करून ती मोडण्याचा प्रयत्न करा. मध्यम प्रमाणात कॉफी घेतली, तर ती सुरक्षित असते, पण अती कैफीन टाळणं हेच हृदयासाठी हितावह आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.