Cholesterol Symptoms  esakal
आरोग्य

Cholesterol Symptoms : शरीराच्या या भागावरची केसं गळतायत तर हलक्यात घेऊ नका; असू शकतो हा गंभीर आजार

...म्हणून चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे

Pooja Karande-Kadam

Cholesterol Symptoms In Hairs : आपल्या शरीरात अनेक प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. त्यातील एक आहे LDL कोलेस्ट्रॉल जो एक घाणेरडा चिकट पदार्थ आहे. तो मज्जातंतूंना ब्लॉक करतो. यामुळे जसजसे ते वाढत जाते तसतसे अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. असे पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करतात.

शरीरातील प्रत्येक पेशीला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. हे हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि पाचक द्रव तयार करण्यास मदत करते. पण नॉर्मल लेव्हलच्या वर जाताच केस बदलायला लागतात.

पायांवरची केस गळती

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे परिघीय धमनी रोग होऊ शकतो. या आजारात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पायापर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नाही. कधी कधी हा आजार सुरू झाला की पाय गळताना दिसतात. जे पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे होते.

कोलेस्ट्रॉल कमी करणारे रस

जॉन्स हॉपकिन्सच्या संशोधकांनी एक संशोधन केले, ज्यामध्ये उंदरांच्या एका गटाला हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय चरबीयुक्त आहार देण्यात आला. त्याचवेळी एका गटाला नॉर्मल हेल्दी डाएट देण्यात आला.

हे संशोधन 'सायंटिफिक रिपोर्ट'मध्ये प्रसिद्ध झाले होते, ज्यात असे दिसून आले होते की, उच्च चरबीयुक्त कोलेस्ट्रॉल आहार घेणाऱ्या उंदरांचे केस अकाली पांढरे झाले होते आणि केस गळण्यास सुरुवात झाली होती.

पुरुषांमध्ये केस गळण्याची कारणे

संशोधकांनी सांगितले की, उच्च कोलेस्ट्रॉल आहार घेत असलेल्या उंदरांना वयाच्या केवळ 36 व्या आठवड्यात तीव्र केस गळतीचा त्रास झाला. उच्च-कोलेस्ट्रॉल आहार घेतल्यानंतर पांढरे केस किंवा केस गळतीची समस्या असलेल्या पुरुषांसाठी, संशोधकांचा असाच पॅटर्न आहे.

पेशींमधील कोलेस्टेरॉल केसांच्या मुळासाठी केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. केरळ विद्यापीठातील संशोधकांनी केलेला अहवाल जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड रिप्रॉडक्शनमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, कोलेस्ट्रॉलची असामान्य पातळी जैवसंश्लेषणास प्रतिबंधित करून फायब्रोसिसला प्रोत्साहित करते. ज्यामुळे केसांचे मूळ कायमचे खराब होऊन केस गळायला सुरुवात होते.

कोलेस्ट्रॉलमुळे केसांमध्ये होणारे बदल सिकॅट्रिशियल अॅलोपेसियास कारणीभूत ठरू शकतात. हा एक दाहक केस गळती डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये टाळूच्या आत असलेल्या केसांची मुळे पूर्णपणे निरुपयोगी होतात आणि टक्कल पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

Latest Marathi News Update : सासवडमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

SCROLL FOR NEXT