Curd Health Benefits
Curd Health Benefits 
आरोग्य

Curd Health Benefits : हाड ठिसुळ होण्यापासून बचाव करतो हा आंबट पदार्थ; कसे करायचे सेवन, वाचा

Pooja Karande-Kadam

Curd Health Benefits: वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की आपल्या प्रत्येक आवयवाची झिज होते. त्यात प्रामुख्याने हाडांचे ठिसुळ होणे, त्यांची झिज होणे या कॉमन गोष्टी आहेत. हाड ठिसुळ झाली की, सांधेदुखी, गुढगे दुखीचा त्रास सुरू होतो. तुम्हाला या समस्येला सामोरे जायचे नसेल. तर, त्यावर काय उपाय करावा हे जाणून घेऊयात.

आज आपण ज्या पदार्थाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे दही. पांढरेशुभ्र दही खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकीच एक म्हणजे हाडांची झिज होण्यापासून वाचवणे.

दही हे असेच एक प्रोबायोटिक अन्न आहे ज्यामध्ये हाडे निरोगी ठेवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. होय, तुम्हाला जरी विचित्र वाटत असेल, परंतु व्हिटॅमिन डी समृद्ध दही खाणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

दह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम देखील असते, ज्याच्या सेवनाने हाडांची घनता वाढते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय हाडांसाठी दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज याविषयीच जाणून घेऊयात.

ऑस्टियोपोरोसिससाठी दही

ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये तुमची हाडे ठिसूळ होऊ लागतात. हे खरं तर कॅल्शियमची कमतरता आणि कमी घनतेच्या हाडांमुळे होते. या स्थितीत तुमची हाडे इतकी कमकुवत होतात की ती कधीही तुटू शकतात. अशा परिस्थितीत दह्यातील व्हिटॅमिन डी हाडांची घनता वाढवून ही स्थिती टाळू शकते.

कॅल्शियमला प्रोत्साहन देते

कॅल्शियमच्या कमतरतेसाठी दही, व्हिटॅमिन डी आणि सी समृद्ध दही, तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियमचे शोषण वाढवते आणि त्यांना मजबूत बनवते. यामुळे हाडांशी संबंधित आजार जसे की संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिसची समस्या टाळता येते.

सांधेदुखीत उपयुक्त

दही तुमच्या सांध्यांना आतून मॉइश्चरायझ करते. त्यांच्यातील घर्षण कमी करते. अशा रीतीने सांधेदुखी कमी करण्यास मदत होते. याशिवाय त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म देखील वेदना कमी करतात. म्हणून, या सर्व कारणांसाठी, आपण निरोगी हाडांसाठी दह्याचे सेवन केले पाहिजे.

कोलेस्टेरॉल

दह्यात सॅच्युरेटेड फॅट्स चे प्रमाण अधिक असते. असे जरी असले तरी ही दही खाल्ल्याने शरीरातील म्हणजेच रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. व रक्तदाब नियंत्रणात राहतो असे संशोधन मष्ये सिद्ध झाले आहे.

त्यामुळे दही खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. दह्यामध्ये प्रोटिन्स चे प्रमाण ही अधिक आहे. त्यामुळे दही खाल्याने पोट भरल्या सारखे वाटते. लवकर भूक लागत नाही. व पर्यायाने वजनही आटोक्यात राहते.

हायड्रेड ठेवतं

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडल्याने आपल्या विकनेस येतो. शरीर कोरडं पडतं. अशावेळी लगेचच एनर्जी हवी असेल तर दही खावे. दही एक अँटीऑक्सिडेंटसारखं काम करतं त्यामुळे आपलं शरीर हायड्रेड होतं.

उष्माघातावर गुणकारी

उन्हाळ्याच्या प्रवासाल बाहेर पडताना, किंवा प्रवासात सोबत तुम्ही दही साखर घेऊ शकता. दही थंड असतं. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघातासारख्या आजारावर दही गुणकारी ठरतं.

रात्री खाऊ नका दही

आयुर्वेदात सांगण्यात आलंय की, रात्री दही खाणे टाळायला हवे. रात्री दही खाल्ल्याने शरीरासाठी एक प्रकारे हानीकारण ठरु शकते. रात्रीच्या वेळी शरीरात नैसर्गिकरीत्या पित्ताचे प्रमाण वाढत राहते.

तसेच रात्री दही खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री दही खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो रात्री दही खाणे पूर्णपणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT