Summer Health Tips google
आरोग्य

Summer Health Tips : उन्हाळ्यात मधुमेहींना या कारणांमुळे आहे धोका; हे उपाय चुकवू नका

पुरेसे पाणी पिणे आणि कॅफिन, अल्कोहोल, शर्करायुक्त पेय, कार्बोनेटेड पेय टाळणे योग्य राहील.

नमिता धुरी

Summer Health Tips : दिवसेंदिवस होणाऱ्या तापमान वाढीमुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. मधुमेहींनी उन्हाळ्यात सतर्क राहणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये निरोगी कसे रहावे आणि काय खबरदारी घ्यावी याविषयी सांगत आहेत मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ फिजिशियन डॉ.मनिष पेंडसे.

मधुमेह असलेल्या लोकांना उन्हाळ्यात अधिक सहजपणे डिहायड्रेशन होते. पुरेसे पाणी न प्यायल्याने एखाद्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि रक्तातील उच्च साखरेची पातळी वारंवार लघवीस कारणीभूत ठरते आणि निर्जलीकरण होऊ शकते.

उन्हाळ्यात मधुमेहाच्या व्यवस्थापनात काही बदल आवश्यक असतात जेणेकरून व्यक्ती सहजपणे थकू नये आणि डॉक्टरांनी शिफारस केलेल्या श्रेणीमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते.

(diabetes management in summer precautions for diabetic patients in summer) हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण ?

मधुमेह असणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :

· पुरेसे पाणी प्या : जर शरीर उष्णतेच्या संपर्कात येत असेल तर एखाद्या व्यक्तीला निर्जलीकरण होते कारण घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. निर्जलीकरणामुळे रक्तातील साखरेची पातळी असामान्य होऊ शकते.

पुरेसे पाणी पिणे आणि कॅफिन, अल्कोहोल, शर्करायुक्त पेय, कार्बोनेटेड पेय टाळणे योग्य राहील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताक किंवा नारळपाणी घ्यावे.

· डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करा : जर कोणी गरम हवामानात बाहेर असेल तर हृदयाची गती जलद होऊ शकते आणि घाम येणे दिसू शकतो ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला इन्सुलिनचे सेवन देखील बदलण्याची आवश्यकता असू शकते म्हणून उन्हाळ्याच्या महिन्यांत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

· दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा : नियमितपणे व्यायाम केल्याने खूप फायदे होतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आवडीची कोणतीही क्रिया करणे ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला मधुमेहासोबत इतर काही समस्या असतील तर उच्च तीव्रतेचे वर्कआउट टाळा.

· उन्हात बाहेर जाऊ नका : तुम्हाला माहिती आहे का ? सनबर्नमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणून सनस्क्रीनचा वापर करा तसेच बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस आणि छत्री वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT