Vitamin P benefits  Sakal
आरोग्य

व्हिटॅमिन 'A,B,C,D'च नव्हे तर ‘व्हिटॅमिन P’ही आरोग्यास फायदेशीर, ‘या’ रोगांपासून होईल सुटका

आरोग्य निरोगी राहण्यासाठी पोषकतत्त्वांचा शरीराला पुरवठा होणे अतिशय महत्त्वाचे असते. ज्याप्रकारे व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन D हे जीवनसत्त्व शरीरासाठी गरजेचे असतात, त्याचप्रमाणे शरीराला ‘व्हिटॅमिन P’ चा देखील पुरवठा होणे महत्त्वाचे असते.

सकाळ डिजिटल टीम

Vitamin P Benefits : आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचं असते. आपल्या शरीरास आवश्यक जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल, अशाच पदार्थांचा आहारात समावेश करण्यावर प्रत्येकानं भर दिला पाहिजे. 

तसेच केवळ व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D च नव्हे तर ‘व्हिटॅमिन P’ देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. व्हिटॅमिन पी ‘फ्लेव्होनॉइड’ (Flavonoids Vitamin P) या नावानेही ओखळले जाते. 

व्हिटॅमिन पी म्हणजे फायटो न्युट्रिएंट्स, ज्यामध्ये अँटी- ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये अँटी-  इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. जाणून घेऊया ‘व्हिटॅमिन पी’मुळे आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात आणि हे जीवनसत्त्व कोणकोणत्या पदार्थांमध्ये आढळते.

‘व्हिटॅमिन P’चे सहा जबरदस्त फायदे 

हृदय राहते निरोगी

‘व्हिटॅमिन पी’युक्त पदार्थांचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत सुरू राहते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे या जीवनसत्त्वामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत   

व्हिटॅमिन पी हे अँटी- ऑक्सिडंटप्रमाणे कार्य करते. हे जीवनसत्त्व आपल्या शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. यामुळे पेशींचे नुकसान होते नाही आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

अ‍ॅलर्जी, अस्थमा, संधिवात आजारावर प्रभावी

व्हिटॅमिन पीमध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीरात जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसंच व्हिटॅमिन पीमुळे अ‍ॅलर्जी, दमा आणि संधिवात यासारख्या आजारांपासून आराम मिळतो. 

त्वचेसाठी लाभदायक 

‘व्हिटॅमिन P’युक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. अशुद्ध रक्तवाहिन्यांची समस्याही कमी होते. तसंच त्वचेवर झालेली जखम देखील लवकर भरून निघण्यास मदत मिळते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर   

‘व्हिटॅमिन पी’युक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांसाठी  फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत सुरू राहते. तसेच दृष्टी देखील सुधारते. 

कर्करोगाचा धोका होतो कमी  

फ्लेव्होनॉइड असल्याने ‘व्हिटॅमिन पी’मध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात.  हे गुणधर्म कर्करोगाच्या पेशींची शरीरातील वाढ थांबवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.  

‘व्हिटॅमिन पी’चा साठा कोणकोणत्या खाद्यपदार्थांमध्ये असतो?

  • लिंबूवर्गीय फळे - संत्री, लिंबू आणि आवळा

  • डार्क चॉकलेट

  • रास्पबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी

  • सफरचंदांमध्ये आढळणारे फ्लेव्होनोन क्वेर्सेटिन हे 'व्हिटॅमिन पी'चा चांगला स्रोत आहे.

  • ग्रीन टीमध्येही ‘व्हिटॅमिन पी’ साठा असतो.  

  • हिरव्या व  पालेभाज्यांमध्येही व्हिटॅमिन पी असते. उदाहरणार्थ पालक आणि ब्रोकली 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Quick Mushroom-Spinach Omelette: हलक्या भूकेसाठी सोल्यूशन हवं आहे? मग ट्राय करा झटपट तयार होणारं मशरूम-पालक ऑम्लेट

Latest Marathi News Live Update : दलित असल्याचे सांगताच रुम नाकारली, वंचितच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

SCROLL FOR NEXT