Paladhi: Ghonas and her cubs caught by the serpent friend Ganesha Sapkal to release in the forest. esakal
जळगाव

Jalgaon News : मादी घोणससह 10 पिल्लांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पाळधी येथील शेतकरी विठ्ठल भिकन लंके यांच्या गायीच्या गोठ्यातील मादी घोणससह दहा पिलांना वन्यजीव संस्थेचे सर्पमित्र गणेश सपकाळे यांनी जीवदान दिले आहे.

याबाबतची माहिती अशी की, शनिवारी (ता. १७) सकाळी सातला सर्पमित्र सपकाळे यांना श्री. लंके यांचा फोन आला, की त्यांच्या गायीच्या गोठ्यात भला मोठा साप आहे. तो गायीला चावू शकतो. लवकर या.

त्यावर सपकाळे यांनी तत्काळ आपले सहकारी सर्पमित्र हेमंत चव्हाण, किरण पाटील, राकेश लोखंडे यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना समोरच अडगळीत घोणस जातीचा विषारी साप दिसून आला. (10 cubs female litter Sarpmitra gave life Incidents at Paladhi snake lover Sapkal released chicks in forrest Jalgaon News)

त्याच्या शरीराच्या हालचालीवरून काहीतरी वेगळे करतोय म्हणून त्याला लगेच न पकडता नेमके काय घडते ते पाहण्यासाठी थांबले.

थोड्याच वेळात घोणस मादी ने पिल्ले द्यायला सुरवात केली. एक-एक करत १० पिलांना जन्म दिला. साधारण पाच ते सात मिनिटांनी सपकाळे यांनी घोणस मादी आणि तिची १० पिल्ले वाचवली आणि निसर्गात मुक्त केली.

जून महिन्याच्या सुरवातीला घोणस मादी साप पिलांना जन्म देते. इतर सर्प एप्रिल, मे महिन्यात अंडी घालतात. नंतर निसर्ग नियमानुसार त्यातून पिले बाहेर पडतात. म्हणून साधारणतः जून, जुलै महिन्यात वयस्क सापांसोबत सापांची पिलेदेखील आढळून येतात. जन्मानंतर ते लगेच वेगळे होतात. मादी साप पिलाचे भरण पोषण करत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घोणस साप, त्याची शरीर रचना, रंग संगती ही कोरड्या पाला-पाचोळ्यासारखी असल्याने तो लवकर दृष्टीस पडत नाही.

शेतात, गोठ्यात काम करणाऱ्या शेत मजुरांना या सापाचा दंश होण्याची शक्यता जास्त असते. कोणत्याही विषारी सापांची नवजात पिलेदेखील तितकीच विषारी असतात. सुरक्षित वातावरण असल्याने मादी साप अडगळीत जाऊन पिलांना जन्म देतात किंवा अंडी घालतात.

त्यामुळे अडगळीत काम करताना विशेष सावधगीरी बाळगावी, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT