robbery esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगाव तालुक्यात चोरट्यांचा हैदोस; दोन ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (जि.जळगाव) : ग्रामीण भागात पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले असून, तरवाडे व खेडगाव या दोन ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या जबरी घरफोडीत जवळपास सहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. खेडगाव येथे बंद घर फोडून २ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. (2 burglaries in broad daylight in chalisgaon jalgaon crime news)

या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडगाव येथे यापूर्वीही जबरी चोरीची घटना घडली होती. खेडगाव येथील शालिग्राम शंकर माळी यांची तिन्ही मुले नोकरीनिमीत्त बाहेरगावी असतात. घरी दोघे पती-पत्नीच असतात दरम्यान बुधवारी (ता.५) सकाळी दहाला शालीग्राम माळी हे पत्नीसह शेतात बाजरीला पाणी भरण्यासाठी गेले होते.

त्यामुळे घराला कुलूप होते. दुपारी चारला माळी हे गायीला चारा पाणी करण्यासाठी दुचाकीवरून घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला होता. घरातील पुढच्या हॉलमध्ये ठेवलेला पलंग सरकावलेला दिसला. तर हॉलमधीलच लाकडी कपाटाचे ड्रावर तोडलेले व पलंगावर सोन्याचे दागिन्यांचे खोके रिकामे दिसले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

चोरट्यांनी शोकेजमध्ये ठेवलेले ८८ हजार रूपये किमतीचे प्रत्येकी ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचा दोन हार, ४० हजार रूपये किमतीची १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ४० हजार रूपये किमतीची सोन्याची चैन, २० हजार रूपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १२ हजार रूपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४ हजार रूपये किमतीच्या ५ भार वजनाच्या चांदीच्या वेल्या, २० हजाराचे ५० भार वजनाच्या चांदीच्या वेल्या, १२ हजार रूपये किमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या व रोख ५० हजार रूपये असा एकूण २ लाख ८६ हजार रूपये किमतीचा ऐवज बुधवारी (ता. ५) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरून नेला. या प्रकरणी शालीग्राम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरवाडेत बंद घरावर डल्ला

येथील नामदेव तांबे हे बुधवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास चाळीसगाव येथील स्वतःच्या मोटरसायकल गॅरेजवर नेहमीप्रमाणे कामाला गेले असता त्यांच्या कुटुंबातील पत्नी, आई, वडील घरच्या शेतात तर मुले शाळेत गेल्याने घराच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते.

त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याने दुपारी साडेबारा ते पाचच्या सुमारास घराचे कुलूप उघडून घरातील कपाटातून ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३२ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

यासंदर्भात तांबे यांनी बुधवारी (ता. ५) चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण तपास करीत आहेत. पोलिस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले असता काही ग्रामस्थांनी सांगितले, की कालच बहाळ व खेडगाव या दोन ठिकाणीही अशीच दुपारच्या वेळेला चोरी झाल्याची घटना घडलेली आहे, या संदर्भात तिन्ही चोरीच्या घटनांमध्ये एकाच चोर असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT