Voting in Raver esakal
जळगाव

Jalgaon News : रावेर तालुक्यात 77.58 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यात आज १६ लोकनियुक्त सरपंच व ९९ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक उत्साहात पार पडली. निवडणुकीत ७७.५८ टक्के मतदान झाले. जानोरी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक मतदान झाले.

आज सकाळपासून ग्रामपंचायतींसाठी ६७ केंद्रांवर मतदानाला सुरवात झाली. खिरोदा (ता. रावेर) येथील मतदान केंद्रावर आमदार शिरीष चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात शेतकरी मतदार असल्याने दुपारी दोननंतर मनदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. (77.58 percent polling in Raver taluka Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

खिरोदा येथे सायंकाळी चारनंतर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खिरोदासह खिरवड, वाघोदा बुद्रूक व थोरगव्हाण या मोठ्या ग्रामपंचायतींसह १८ ग्रामपंचायतीसाठी सर्वत्र मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. सकाळी साडेनऊपर्यंत ५ हजार १० मतदारांनी मतदान केल्याने १४.५९ टक्के मतदान झाले.

त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. साडेअकरापर्यंत ३३.६० टक्के, दुपारी दीडपर्यंत ५१.६१ टक्के, दुपारी साडेतीनपर्यंत ६७.५७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत १८ हजार ९६६ पैकी १२ हजार ६७४ पुरुषांनी तर १७ हजार ३९२ पैकी १३ हजार ९७१ महिलांनी असे एकूण ३६ हजार ३५८ पैकी २६ हजार ६४५ मतदान केल्याने एकूण ७७.५८ टक्के मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT