Abductors of girls case registered against both crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलींना नेले पळवून; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन गर्भवती करणाऱ्या दोन संशयितांवर पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय मुलगी २६ डिसेंबर २०२२ ला सकाळी दहाच्या सुमारास बिस्कीटपुडा घेण्याच्या नावाने बाहेर पडून आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून प्रियकर विजय बारकू भिल (वय २०) याला फोन करून त्याच्यासोबत शिरपूर येथे पळून गेली. तेथून ते लखदिरपूर (ता. मोरवी, गुजरात) येथे गेले होते. (Abductors of girls case registered against both jalgaon crime news)

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख, नीलेश मोरे, नम्रता जरे यांनी दोघांना मोरवी येथून ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीत मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यावर संशयित विजय याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत जवखेडा येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला संशयित सुरेश दयाराम मालचे (वय ३३) याने २१ डिसेंबर २०२२ ला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोघेही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी येथे पळून गेले होते. मंदिरात लग्न लावले. नंतर भडाणे (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे आले.

संशयित सुरेश याने आपल्या पहिल्या पत्नी व मुलांना बोलावून घेतले होते. पोलिस नाईक कैलास शिंदे, भूषण पाटील यांनी दोघांना चांदवड येथून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी मुलीचा जबाब घेतला असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले. संशयिताला पोक्सो कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT