Jalgaon: Black horseshoe seized by Wildlife Conservation Society. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘नाल’ साठी काळ्या घोड्यांचे हाल; वन्यजीव संरक्षण सदस्यांनी थांबविली तस्करी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : काळ्या रंगाच्या घोड्याची नाल शुभ मानली जाते. या नालीच्या विक्रीसाठी काळ्या रंगाच्या घोड्यांना असह्य वेदना पोहोचविणाऱ्या व्यावसायिकांना वन्यजीव संरक्षण संस्थेने कायद्याच्या कचाट्यात अडकविले आहे. याप्रकरणी तिन्ही व्यावसायिकांना नशिराबाद पोलिस ठाण्यात आणले गेले.

गोरखधंदा करण्यासाठी खुरांची सातत्याने चाळणी होत असल्याने तिन्ही घोड्यांना दिवसभर वेदना सहन कराव्या लागत असल्याचा हा संतापजनक प्रकार सुरू असताना, वन्यजीव संरक्षण संस्थेने त्याची दखल घेतली.

तीन काळ्या रंगाचे घोडे गेल्या तीन दिवसांपासून तरसोद फाटा भागात दिसून येत आहेत. या घोड्यासोबत असलेले तिन्ही जण घोड्याची नाल विक्री करण्यासाठी रोडवर ठाण मांडून बसतात, याची माहिती कळताच वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी या तिघांचा शोध सुरू केला होता.(Black horses for Naal Wildlife conservation members stop smuggling 50 kg of cord seized Jalgaon News)

काळ्या घोड्याच्या नालेबाबत अंधश्रद्धा

काळ्या घोड्याची नाल अंधश्रद्धाळू नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते, म्हणूनच या नालसाठी तीनशे ते पाचशे रुपये अनेकांनी मोजल्याचे समोर आले आहे. विज्ञान व आधुनिक जगात वावरत असतानाही सुशिक्षित लोक, अशा अंधश्रद्धाच्या आहारी धावतच असतात.

घोड्याचे करतात हाल

नाल विक्री झाली, की हा व्यावसायिक घोड्याचा पायाला दुसरी नाल ठोकतो आणि ग्राहक आल्यावर पुन्हा काढतो. त्यामुळे घोड्याच्या खुरांना अनेक छिद्रे पडून जखमा होत आहेत. त्यामुळे त्यांचा पाय लंगडतो. मुक्या जनावरांना अशा पद्धतीने अमानुष वागणूक दिली जाते. हे प्राणी क्लेश कायद्याचे उल्लंघन ठरते.

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, जगदीश बैराणी, मयूर वाघुळदे यांनी या व्यावसायिकांचा तरसोद फाटा येथे शोध सुरू केला असता, तरसोद फाटा येथे घोड्यासह उभे असलेल्या तिन्ही व्यावसायिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ सुमारे ५० किलो नाल आणि तितकेच नाल बनविण्याचे साहित्य आढळून आले.

त्यांना नशिराबाद पोलिस ठाण्यात आणले. तिघेही व्यावसायिक परप्रांतीय आहेत. ताब्यात घेतलेल्या तिन्ही व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नशिराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

"ज्योतिष जाणकारांच्या माहितीनुसार काळ्या घोड्याच्या पायावर शनिचा विशेष प्रभाव असतो. नाल लोखंडापासून बनविलेली असते. लोह शनिचा धातू आहे. शनिचा रंग काळा आहे आणि आवडता रंग आहे. घोड्याची नाल असल्याने शनिचा प्रकोप संपुष्टात येतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, ही अंधश्रद्धा आहे. यामुळे निष्पाप घोड्यांचा जीव टांगणीला लावला जात आहे."

-योगेश गालफाडे, सचिव, वन्यजीव संरक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT