esakal
जळगाव

Jalgaon News: उघड्या डिपीने घेतला 3 म्हशींचा बळी; कंपनीच्या कारभाराचा शेतकऱ्याला फटका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कुसुंबा (ता.जळगाव) येथे उघड्या विद्युत रोहित्रातून विजेचा धक्का लागून रस्त्याने जाणाऱ्या तीन म्हशी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यात शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. (buffalo were killed on spot due to electric shock jalgaon news)

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी रवींद्र गुलाब पाटील (वय-४१) परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन ते दुग्ध व्यवसाय करतातात. नेहमीप्रमाणे रविवारी (ता.१२) सकाळी ९ वाजता ते त्यांच्या मालकीच्या ३ म्हशी घेऊन शेतात चारण्यासाठी नेत होते.

त्यावेळी रस्त्यावरील इलेक्ट्रिक डीपी जवळून म्हशी जात असताना त्यांना उघड्या डीपीतील वीजतारेचा धक्का लागल्याने तीन म्हशी जागीच ठार झाल्या. घटना घडल्यानंतर कुसुंबा गावाचे पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी धाव घेवून पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून जेसीबीच्या माध्यमातून म्हशींचे मृतदेह दफन करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कार्ड कारभारामुळे रविंद्र पाटील या शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी देखील मागणी केली जात आहे.

म्हशींना मिळेना नुकसान भरपाई

पै न पै जोडून शेतकऱ्याने म्हशी गोळा केल्या.. बाजारभावानुसार लाख रुपयांच्या घरात एक म्हैस पडते. मात्र, अशी दुर्घना घडली की, महावितरण हात वर करुन मोकळे होते. गेल्या वेळेस कुसुंब्यात अशाच घटनेत शेतकऱ्यास मेटाकुटीस आणून नंतर पंधरा हजार रुपये फेकून मारल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी बोलून दाखविा. महावितरणच्या मानवी चुकीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊनही महावितरण करुन शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याने ग्रामीण भागात महावितरणा विरुद्ध प्रचंड रोष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT