jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : वाळूचोर अन्‌ महसूल कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की; कानळदातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कानळदा (ता. जळगाव) येथे शुक्रवारी (ता. १९) अवैध वाळू नेताना एका बैलगाडीचालकाला महसूल पथकाने हटकले असता, त्याने कुटुंबीयांसह महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करीत बैलगाडीसह वाळू चोरून नेली. (bullock driver stole sand illegally jalgaon crime)

याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे आदी प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कानळद्यात वाळूउपशाला नागरिकांचा विरोध आहे. यामुळे नागरिक नदीपात्रात ट्रॅक्टर, डंपर शिरू देत नाहीत. मात्र, काही वाळूचोरांनी आता ट्रॅक्टरऐवजी बैलगाडी नदीपात्रात नेऊन वाळू उपसून तिचा साठा करणे व विक्री करणे, असा वाळूचोरीचा नवा फंडा अवलंबिला आहे. नागरिकांनी या प्रकाराबाबत तहसीलदार विशाल सोनवणे यांना माहिती दिली.

श्री. सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी कानळदा गावात जाऊन पाहणीही केली. वाळू जप्त केली. शुक्रवारी सकाळी मनोज रतन पारधी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू काढत असल्याची माहिती पोलिसपाटील नारायण पाटील यांनी तहसीलदार सोनवणे यांना दिली.

त्यांनी मंडलाधिकारी किशोर बाविस्कर, किशोर ठाकरे, वाहनचालक मनोज कोळी यांना घेऊन कानळदा गाठले. तेथे वाळू वाहतूक करणाऱ्या मनोजला वाळूचा परवाना आहे का, अशी विचारणा केली.

मात्र, ‘परवाना नाही, आम्ही अशीच वाळू काढतो’. ‘तुमच्याकडून होईल ते करून घ्या’, असे सांगितले. त्यावर तहसीलदार सोनवणे यांनी ‘बैलगाडी आम्ही जप्त करतोय, पोलिस ठाण्यात चल’, असे सांगताच दीपक मनोज पारधी, सुनंदा पारधी यांनी येऊन महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मंडलाधिकारी बाविस्कर यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

नंतर दोन बैल, वाळूसह बैलगाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. तालुका पोलिस ठाण्यात मनोज पारधी, दीपक पारधी, सुनंदा पारधी यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT