four arrested for demanding ransom  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला पिस्तूल लावून मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : शहरातील दत्तनगरात चौघांनी एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून खंडणी (Ransom) मागितली. तसेच धाक दाखवून पैसे हिसकावल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against 4 people for extorting money by showing fear pistol demanded ransom jalgaon news)

शहरातील दत्तनगरात संशयित तरुण निखिल राजपूत, अक्षय न्हावकर ऊर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांनी फिर्यादीचे मित्रांना शनिवारी (ता. ११) रात्री अकराला अडवून निखिल राजपूत याने डोक्याला बंदूक लावून खंडणी मागितली, तसेच त्यांना पकडून खिशे तपासून पैसे हिसकावल्याने चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तनगर हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत याच्या घराजवळ फिर्यादीचे मित्र अमर देविदास कसोटे,कुणाल राजू शिंदे, आकाश गणेश फाबियांनी यांना निखिल राजपूत,अक्षय न्हावकर ऊर्फ थापा, अभिषेक शर्मा,पवन चौधरी यांनी अमर देविदास कसोटे यांच्या डोक्याला बंदूक लावून खंडणी मागितली, तसेच त्यांनी त्यांचे खिशे तपासून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यातील संशयितांनी कसोटे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात जय मुनोज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये तपास करीत आहेत. या संशयितांविरुद्ध मोक्का गुन्हा दाखल आहे. न्यायालयात त्यांच्या अटकेसंदर्भात सुनावणी प्रलंबित आहे. संशयित मोकाट फिरत असून गुन्हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : २८० कोटींच्या ग्रोबझ फसवणुकीत पोलिसांचा तपास उघड न्यायमूर्तींची झाडाझडती; ‘तपास केला तरी काय?’ असा थेट सवाल

Babasaheb Ambedkar Video : आपल्या भीमाचा दरारा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ३ अस्सल दुर्मिळ व्हिडिओ, एकदा बघाच

Viral Video: AI आलं अन् सगळंच बदललं! २०३२ चं जग पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, आपली जागा कुठे? भविष्य अतिशय जवळून पाहा

Jamkhed News: माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, कलाकेंद्रातील नृत्यांगणेनं केलं असं.. | Rohit Pawar | Sakal News

Junnar Gold Mango : जुन्नर गोल्ड आंबा वाणाला केंद्र शासनाकडून शेतकरी जात म्हणून अधिकृत मान्यता

SCROLL FOR NEXT