Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Bazar Samiti Result Analysis : आमदार चव्हाणांची व्यूहरचना ठरली भेदक; ‘मविआ’तील गटबाजीचे निकालावर पडसाद

सकाळ वृत्तसेवा

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीत येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’च्या पॅनलने १८ पैकी १५ जागा मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार चव्हाण यांनी जिल्हा दूध उत्पादक संघ व जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका पार पाडली. (chalisgaon market committee result analysis mla chavan strategy worked again for winning jalgaon news)

त्याचा फायदा त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीतही त्यांची व्यूहरचना भेदक ठरली असून, त्यांनी पुन्हा एकदा तालुक्याच्या सहकारावर मजबूत पकड केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत गटबाजी, कॉंग्रेसमधील नाराजीचा फटका त्यांच्या पॅनलला बसला व निकालात त्याचे पडसाद उमटले.

आमदार चव्हाण यांनी तालुक्यातील विविध सहकार व शिक्षण संस्थांचे संस्थापक उंबरखेडचे (स्व.) रामराव दगडू पाटील तथा जिभाऊ यांच्या नावाने ‘स्व. रामराव जिभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनल’ असे पॅनलचे नाव ठेवल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. जिभाऊ हे बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांचे मानसपुत्र काँग्रेसचे (स्व.) उदेसिंग रामसिंग पवार तथा अण्णा (वरखेडे बुद्रुक) यांनी बाजार समितीचे सभापती पद ३५ वर्षें सांभाळले.

गेल्या वेळी २०१५ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील यांचे सुद्धा बहुमताने पॅनल विजयी झाले होते. मात्र सभापती निवडीवरून भाजपमध्येच मतभेद झाले आणि शिवसेनेला उपसभापती द्यायचे ठरले आणि भाजपचे रवींद्र पाटील (उंबरखेड) यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या सहकार्याने २०१९ पर्यंत सभापतिपद मिळविले. सन २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सभापती पाटील यांना सभापतीपद सोडावे लागले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आणि भाजपचे सरदारसिंग पाटील यांना संधी मिळाली. राज्यात सत्तापरिवर्तन झाले. बाजार समितीची मुदत संपल्यानंतर प्रशासकपदी दिनेश पाटील यांची नियुक्ती झाली. सभापती जरी भाजपचा होता, तरी सर्व सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांच्याकडे होती.

बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार चव्हाण व माजी आमदार देशमुख यांनी भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र महाविकास आघाडी जरी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची होती. मात्र उमेदवारी देताना काँग्रेसचे तीन कार्यकर्ते इच्छुक असताना एकाही कार्यकर्त्याला संधी दिली नाही.

त्यामुळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष अशोक खलाणे यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेची ही युती असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान करू नये, असे आवाहन केले आणि प्रसिद्धी माध्यमाना मुलाखती दिल्या. त्याचा फायदा आमदार चव्हाण यांच्या पॅनलच्या उमेदवारांना झाला.

तालुकाध्यक्ष अनिल निकम, माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले.

आमदार चव्हाण यांनी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी गेल्या चार वर्षांमध्ये केलेली विकासाची कामे, गावासाठी दिलेला निधी, त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत मतदारसंघातील भाजपच्या शेतकरी सहकारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ग्रामीण भागात आमदार चव्हाण यांची पकड मजबूत झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT