Chandrakant Patil raised issue of failed Bodwad water supply scheme in legislative assembly jalgaon news esakal
जळगाव

MLA Chandrakant Patil : बोदवड पाणीपुरवठा योजना अपयशी; आमदार पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा

MLA Chandrakant Patil : मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणारी ५१ गावे पाणीपुरवठा योजना ही केवळ कागदावर निर्माण झाली असून, बोदवडवासीयांची तहान भागविण्यास अपयशी ठरलेली आहे.

ही योजना वाढीव करणार आहात का? बोदवडवासियांना दररोज पाणी देण्यासाठी आपण संवेदनशील आहात का? अशी लक्षवेधी मांडत आमदार चंद्रकांत पाटील विधानसभेत गरजले. (Chandrakant Patil raised issue of failed Bodwad water supply scheme in legislative assembly jalgaon news)

ही योजना १ जानेवारी २०१८ ला पुनर्जीवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले, परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता प्रति माणसी ४० लिटर पाणी देण्याची तरतूद करण्यात आली, तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी ठेवूनही ही योजना तयार करताना दिसून येणे.

केवळ कागदावर निर्माण झालेली ही अपूर्ण योजना आज रोजी बोदवडवासियांची तहान भागविण्यास अपयशी ठरलेली आहे.

ही योजना नव्याने करणे अपेक्षित असताना पुनर्जीवित करून तत्कालीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाइपलाइनची क्षमतादेखील कमी करून भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता आणि इतर असंख्य त्रुटी व अडचणी याचा सारासार विचार संबंधित विभागाने तोडक्या स्वरूपाची योजना तयार करून कंत्राटदारांच्या घशात घालण्याच्या हेतूने त्रुटी कायम ठेवून योजना पुनर्जीवित करणे, ही योजना पुनर्जीवित करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करून ५ वर्षे उलटूनही जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात न येणे आदी मुद्दे आमदार चंद्रकांत पाटील यांनी न उपस्थित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ५१ गाव पाणीपुरवठा योजनेचा उद्भव पूर्णा नदीवरून असल्याने पूर्णा नदी पात्रात प्रचंड गाळ वाहून येत असतो, तसेच या पात्रात शहराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हे पाणी फिल्टर होण्यासाठी बराच अवधी लागत असल्याने अनेक गावांचा पाणीपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे २०-२० दिवस खोळंबतो. असे सांगत त्यांनी यातील त्रुटीही समोर आणल्या.

तत्काळ उपाययोजना : गुलाबराव पाटील

लक्षवेधीवर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की आमदारांनी मांडलेले प्रश्न खरे असून त्यांनी मागणी केल्यानुसार नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चार जुलैला आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडलेली आहे. तरी तत्काळ या संदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधीवर उत्तर देताना आश्वासित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT