Staff carrying food packets and water bottles for citizens, A person with disabilities who came for the program and Court Chowk road closed with barricades.  esakal
जळगाव

CM Shinde in Jalgaon : बस, चारचाकी वाहनांनी शहर गजबजले; ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या अधिक

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde in Jalgaon : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्याांसाठी जिल्हा प्रशासनाने बसची व्यवस्था केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील ग्रामीण भागातून नागरिक सभेसाठी आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

प्रत्येक लाभार्थ्याला ‘लाभार्थी’ असा बिल्ला छातीवर लावण्यास दिला होता. सोबतच बसचा प्रवासही मोफत असल्याने सकाळी दहापासूनच ग्रामीण भागातील नागरिक जळगाव शहरात येताना दिसले. (cm shinde jalgaon daura number of citizens in rural areas is more news)

काही वाहनांनी लाभार्थ्यांना थेट सभास्थळी सोडले. काहींनी पार्कींग जी. एस. मैदानावर सोडल्याने लाभार्थी गटागटाने पोलिस कवायत मैदानावर जाताना दिसले. सकाळी अकरापासूनच आकाशवाणी चौक ते कोर्ट चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.

केवळ एकरी रस्ता सुरू होता. तोही लाभार्थ्यांच्या बस, पोलिसांची वाहने, अत्यावश्यक वाहनांची ये-जा करण्यासाठी. लोकल सर्व वाहनांना रस्ता बंद केला होता.

या मार्गावर येणाऱ्या सर्व वाहनांना रोखण्यासाठी उपरस्त्यावर पोलिसांनी कठडे लावले होते. यामुळे शहरातील नागरिकांना पर्यायी मार्गांनी गावात यावे लागले.

शाळेच्या रिक्षा बंद

आकाशवाणी चौक ते कोर्ट चौकादरम्यान अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. शाळा दुपारी बारापर्यंतच होत्या. मात्र, शाळेत रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचालकांनी सकाळीच संबंधित पालकांना फोन करून ‘आकाशवाणी ते कोर्ट चौक रस्ता बंद असल्याने रिक्षा बंद आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाल्यांना तुम्ही शाळेत न्यावे’, असे सांगितले. यामुळे अनेक पालकांना पाल्यांना शाळेत नेण्याची कामगिरी करावी लागली.

लाभार्थ्यांना जेवणाची पाकिटे अन्‌ पाणी

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आलेल्या लाभार्थ्यांना जेवणाची पाकिटे अन्‌ पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या होत्या. लाभार्थी सभेसाठी सकाळपासूनच आले होते. त्यांनी तेथे आरोग्य तपासणी करून घेतली. काहींनी रक्तदानही केले.

सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी

आकाशवाणी चौकात दुपारी बारापासून पोलिसांनी बॅरिकेट्‌स लावून वाहतूक पर्यायी मार्गे वळवली होती. यामुळे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केटजवळील शासकीय मुलींचे वसतिगृहाजवळ, बेंडाळे महाविद्यालय, स्टेट बॅंक चौक या उपरस्त्यांवर वाहतूक वळविल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

बाजारपेठेत शुकशुकाट

शहरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात येण्याचे टाळले. यामुळे दुपारी एकनंतर सायंकाळपर्यंत गोलाणी मार्केट, फुले मार्केट, चौबे मार्केटसह बाजारात शुकशुकाट दिसून आला.

महामार्ग दुपारी एकपासून बंद

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जळगाव शहरात येणार असल्याने दुपारी एकपासूनच पाळधीपासून जळगावकडे येणारा महामार्ग बंद करण्यात आला. शिरसोलीकडून येणारी मोठी वाहने डी मार्टकडेच थांबविण्यात आली. भुसावळ, जामनेरकडून येणारी वाहने अनुक्रमे खेडी, कुसुंबा येथे थांबविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: ठाकरे ब्रँण्डला नागरिकांनी नाकारले आहे- मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT