Election News esakal
जळगाव

Jalgaon News | नाशिक पदवीधर संघाची 30 जानेवारीस निवडणूक : जिल्हाधिकारी अमन मित्तल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारी २०२३ ला होणार आहे. त्याची प्रक्रिया येत्या ५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे या वेळी उपस्थित होते.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे असतील. निवडणुकीच्या प्रक्रियेला ५ जानेवारीपासून नाशिकला सुरवात होईल. (Collector Aman Mittal Election of Nashik Graduate Union on January 30 Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

यात ५ ते १२ जानेवारीदरम्यान अर्ज दाखल करणे, १३ जानेवारीस अर्जांची छाननी होईल. १६ ला अर्ज माघारीचा दिवस आहे. ३० जानेवारीस सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदानाची वेळ आहे. २ फेब्रुवारीस मतमोजणी होईल.

मतदानासाठी जळगाव जिल्ह्यात एकूण ४० केंद्रे आहेत. पदवीधर मतदारसंख्या ३३ हजार ५४४ आहे. अमळनेर तालुक्यात तीन केंद्रे, चोपडा तालुक्यात चार, यावलला दोन, रावेरला तीन, मुक्ताईनगर, बोदवडला प्रत्येकी एक केंद्र असेल.

भुसावळला तीन, जळगावला सहा, धरणगावला एक, एरंडोल, पारोळा, भडगाव, पाचोरा येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे असतील. चाळीसगाव व जामनेरला प्रत्येकी चार मतदान केंद्रे असतील. मतदान केंद्राबाबत काही हरकती असल्यास त्यावर ५ जानेवारीपर्यंत हरकती दाखल करण्यात येतील. या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT