Cotton Crop esakal
जळगाव

Jalgaon News : कापसाचे दर तेजीत, मात्र मार्केटमध्ये कापूस येईना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारपेठेत शुक्रवारी (ता. ६) खंडीचे दर अचानक वाढल्याने जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात व्यापाऱ्यांनी वाढ केल्याचे चित्र होते. चार दिवसांपूर्वी कापसाचे मार्केट डाउन होऊन कापसाचे दर सात हजार ३०० ते सात हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते.

त्यात तीन दिवसांपूर्वी वाढ होऊन आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला मिळाला. यामुळे कापूस मार्केट तेजीत येण्याची शक्यता वाढली होती. असे असले तरी शेतकरी अद्यापही बाजारात कापूस विक्रीस आणीत नाही.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात काही जिनिंग चालकांनी १३ हजार ते १५ हजारांचा दर कापसाला दिला होता. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आताही तोच दर मिळावा, अशी मागणी करीत आहे. कापूस बाजारात येत नसल्याने जिनिंग प्रेसिंग मिल्स बंदच्या अवस्थेत आहेत. (Cotton prices rise but cotton does not come in market Jalgaon News)

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळावा, यासाठी राज्यात ‘सीसीआय’तर्फे खुल्या बाजारात कापूस खरेदी केंद्रे सुरू होती. असे असताना चार दिवसांपूर्वी देशभरात कापसाचे दर गडगडून कापूस मार्केट ‘क्रॅश’ झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी राज्यभरात कापूस विक्री थांबविली होती. साडेआठ हजारांवरून सात हजार ३०० ते साडेसात हजारांपर्यंत कापसाचे दर खाली आले होते.

कापसाला मागील वर्षाप्रमाणे दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवणे रास्त आहे. मात्र, मागील वेळेस कापूसच उत्पादित झाला नव्हता. यामुळे कापूस मिळेल त्या दरात घेणे जिनिंग चालकांना आवश्‍यक होते. मागील वर्षी १३ ते १५ हजारांचा मिळालेला दर यंदाही मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र, यंदाची स्थिती वेगळी आहे. कापसाचे मोठे उत्पादन झाले आहे. ९५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. शासकीय हमी दर सहा हजार ३०० रुपये आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

अशी आहे वस्तूस्थिती

हंगामाच्या सुरवातीस काही जिनिंगचालकांनी १३ ते १५ हजारांचा दर कापसाला दिला. तेव्हा कापूस काही क्विंटलच होता. मात्र, या मिळालेल्या दराने मजुरांच्या कापूस वेचणीचे दर वाढले. पाच ते सात रुपये किलोप्रमाणे वेचलेल्या जाणाऱ्या कापूसचा एकदम १० ते १२ रुपयांवर दर गेला. सोबत कापसावरील फवारणी, खते, कीटकनाशके यांचे दरही वाढले. परिणामी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. यामुळे शेतकरी कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मागत असतील, तर ते योग्य आहे.

आता जिनिंगचालक आठ हजार ते साडेआठ हजार रुपये देत आहेत. मात्र, पूर्वी दिलेल्या दरानंतर सर्वच खर्च वाढला आहे. याचाही विचार जिनिंगचालकांनी करीत कापसाला दर दिला पाहिजे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. काही जिनिंगचालकांनी सुरवातीस दिलेल्या दरामुळे आता शेतकरी कापूस मार्केटमध्ये आणत नाही. संपूर्ण जिनिंग, प्रेसिंग इंडस्ट्री ब्लॉक होण्याच्या मार्गावर आहे.

एक लाख गाठींच्या कापसाची दररोज गरज असताना, केवळ अकराशे ते बाराशे गाठींच्या कापसाची होणारी आवक जिनिंगचालकांना मोठे नुकसानकारक ठरत आहे. कापसाच्या आवकेत वाढ होण्यासाठी ‘सीसीआय’ने बाजारात उतरण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT