A farmer giving a statement to District Officer Jitendra Patil regarding wildlife management.  esakal
जळगाव

Jalgaon News : शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी मेटाकुटीला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत.

तालुक्यातील वरणगाव परिसरातील विविध गावांच्या शिवार शेतातील कोवळ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासाडी केली जात असून, या प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Crops are eaten by wild animals in farm jalgaon news)

तालुक्यातील वरणगाव परिसरातील विविध खेड्यांच्या शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील पिके यंदा जोमात असून, रात्री, अपरात्री रानडुकरांसह हरीण, सांबर, निलगायी अशा विविध जातींच्या वन्यप्राण्यांनी संपूर्ण शिवारात डोंगरमाथ्याच्या शेजारील शेतांमध्ये तर अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहेत.

वन्यप्राण्यांचे कळपांचे कळप शेतात येऊन नासाडी करण्यावाचून थांबत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने वरणगावसह परिसरातील प्रत्येक गावाचे शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी.

संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने वरणगाव शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वारंवार दुष्काळी परिस्थिती

दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर येणारी संकटे तर कधी अवकाळी पावसाचे फटके, गारपीट, शेतमालाला भाव नसणे आणि त्यातच भुसावळ, बोदवड तालुक्यात निलगायींचा तथा रानडुकरांचा वावर वाढला आहे. या नीलगायी व रानडुकरांमुळे शेतात पीक उभ राहू शकत नाही.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असताना वरणगाव आणि परिसरातील डोंगराळ भागात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका बसत आहे.

वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुधाकर जावळे, वाय. आर. पाटील, महेश सोनवणे, दीपक मराठे, अशोक शिंदे, शशिकांत पाटील, मनोज सपकाळे, समाधान पाटील, अनिल महाजन, सतीश पाटील, किशोर भंगाळे, योगेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केली असून, निवेदनावर शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT