Rohit Marathe esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे; सरावासाठी धावताना वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कजगाव (ता. भडगाव) : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळ धावण्याचा सराव करणाऱ्या येथील तरुणासाठी आजची सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून पळत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी (ता. ३०) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील रोहित अशोक मराठे (वय १८) हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर ‘माॅर्निक वाॅक’साठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बालाजी पेट्रोल पंपाजवळ रोहितला मागून जोरदार धडक दिली. (Dream of becoming a policeman remained unfulfilled Youth dies after being hit by vehicle while running for practice Incident at Kajgaon Jalgaon News)

या भीषण अपघातात रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला.

यावेळी मित्र वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील, मदतीला धावले होते, तसेच पुढील उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन लावून उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची वार्ता कजगावात समजतात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेला रोहीत मराठे यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सकाळ ठरली काळ

रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याला पोलिस विभागाचे विशेष आकर्षण होते. त्यासाठी तो आपल्या मित्रांसोबत सकाळी माॅर्निग वाॅक करणे, सायंकाळी भरतीसाठी सराव करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या रोहितची सकाळ जणू काळ ठरली. ही घटना संपूर्ण गावातील नागरिक व रोहीतच्या मित्रांना धक्का देणारी आहे.

अंत्ययात्रेला मित्रांसह गर्दी

रोहित मराठे याचा मृतदेह घरी आणल्यानंतर आई, वडिलांनी रोहितला पाहताच हंबरडा फोडला. या वेळी उपस्थित नागरिकांना देखील अश्रू अनावर झाले होते. या वेळी रोहीतच्या मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सायंकाळी साडेपाचला शोकाकुल वातावरणात रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT