Eknath Khadse News esakal
जळगाव

Eknath Khadse : खडसे नॉटरिचेबल असल्याच्या निव्वळ अफवाच; खरं कारण आलं समोर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गेल्या आठ दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याचे वृत्त समोर आले होते.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Khadse News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गेल्या आठ दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याचे वृत्त समोर आले होते.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

त्यांच्या अचानक नॉटरिचेबल होण्यामुळे जळगावसह राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते.

मात्र, खडसे नॉटरिचेबल झालेले नव्हते, तर, खडसेंच्या पायाची नस दुखावली गेल्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

साधारण तीन ते चार दिवस उपचार घेऊन खडसेंना घरी सोडण्यात आले असून, ते घरी आराम करत आहेत. यामुळे त्यांचे दोन्ही फोन लागत नसल्याचे समोर आले आहे.

खडसेंशी गेल्या आठ दिवसांपासून संपर्क होत नसल्याने ते नॉटरिचेबल असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

खडसे नॉटरिचेबल असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? असे वृत्त काही माध्यमांशी प्रकाशित केले होते. परंतु, आता खडसे त्यांच्या पायाच्या उपचारांसाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते.

यामुळेच त्यांचे फोन लागत नसल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे खडसे नॉटरिचेबल असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.

खडसे हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आहेत. मुक्ताई नगरातील ते आमदार असून त्यांनी महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपदही भूषवलं आहे.

2020 मध्ये भारतीय जनता पार्टीतील मतभेद आणि अस्वस्थतेमुळे त्यांनी 21 ऑक्टोबर रोजी भाजपाला रामराम केलं. त्यानंतर त्यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही खडसेंना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

त्यात गेल्या आठ दिवसांपासून खडसे नॉटरिचेबल असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून, पायावरील उपचारांसाठी खडसे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. याचमुळे त्यांचा फोन नॉटरिचेबल होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT