Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon Government Medical College and Hospital esakal
जळगाव

Jalgaon GMC : जीएमसीत नवजात बालकांची अदलाबदल; अन्‌ उडाला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नजरचूकीत नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार मंगळवार रोजी घडला. दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. (Exchange of 2 newborn babies in Government Medical College and Hospital jalgaon news)

मंगळवारी (ता.२) सकाळी ११ वाजेनंतर ही घटना घडल्यानंतर संध्याकाळपर्यंत गोंधळ सुरुच होता. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल केले असून पोलिसांमार्फत डीएनए टेस्टद्वारे या बालकांच्या खऱ्या मातांचा शोध घेतला जाणार असल्याने वादावर तूर्त पडदा पडला असून परिचारिकांच्या कमतरतेमुळेच ही घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जीएमसीमध्ये प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०) आणि प्रतिभा भिल (वय २०) या दोन्ही गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. झटके येत असल्याने त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाकडून घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली.

अन्‌ येथेच वादाची ठिणगी पडली. नवजात शिशू पालकांकडे सोपवितांना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनिकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. काही वेळाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दोन्ही नवजात शिशुंचे पालकांनी आक्रमक होत त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच समजत नसल्याने पालकांचा गोंधळ उडत होता. वाद वाढत चालला असल्याने पाहून प्रशासनाने दोन्ही नवजात शिशुंना आपल्या ताब्यात घेतले. त्यांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले.

जीएमसीमध्ये नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याची एका पालकाची तक्रार पोलिसांकडे आली आहे. त्या अनुषंगाने जीएमसीशी पत्रव्यवहार करून बाळांची डीएनए चाचणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

डीएनए टेस्टचा निर्णय

खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशू आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही माता अत्यवस्थ असल्याने अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी समिती गठित केली आहे. डीएनए चाचणी रक्ताच्या नमुन्यांच्या आधारे केली जाते. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गडचिरोलीत मोठी नक्षलविरोधी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

Health Survey : जेवणात जास्त मीठ खाणाऱ्यांना होऊ शकतो कॅन्सर?; व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा अहवाल

China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

Latest Marathi News Live Update : मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT