during eye examination of students through Aadhaar multi-purpose organization at Dutt Vidya Mandir School esakal
जळगाव

Jalgaon news : मोबाईलच्या अतिवापराने डोळ्यांचे विकार; संस्थेचे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा

पातोंडा (जि. जळगाव) : मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये जवळपास ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे पाणी गळणे, डोळे चुळचुळ करणे, डोळ्यांची जळजळ होणे,

डोके दुखणे, लांबचे कमी दिसणे, भुरसट दिसणे आदी समस्या उद्भवत असल्याचे आधार संस्थेने २७ शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. (Eye disorders due to excessive use of mobile phones aadhar institute survey jalgaon news)

सध्या आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन नेत्रतपासणी शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेत्रतपासणी करीत आहे. आतापर्यंत दत्त विद्या मंदिर पातोंडा, आदर्श विद्यालय अंमळगाव, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, माध्यमिक विद्यालय वावडे, अंतुर्ली, मंगरूळ, सारबेटे, गडखांब आश्रमशाळा, रणाईचे यासह २७

शाळांमध्ये नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून डोळ्यांचा नंबर काढणे, नंबर लागला तर मोफत चष्मा बनवून देणे व ठराविक विद्यार्थ्यांमध्ये काही विशेष बाब आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यास अमळनेर येथील डाॅ. राहुल मुठे यांच्याकडे आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत उपचार करवून घेत आहे, अशी माहिती आधार संस्थेच्या निकिता पाटील यांनी दिली.

नेत्रतपासणी शिबिरांमध्ये सरासरी जवळपास ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांमध्ये विकार आढळून येत आहेत. या आधारावर दत्त विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप शिंगाणे व पर्यवेक्षक व्ही. सी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळावा, याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

"मोबाईल व टीव्हीचा अतिवापर, मुलांच्या आहारात पालेभाज्यांचे कमी प्रमाण, विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात मोबाईल पाहिल्याने मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे मुलांना डोळ्यांचे विकार जडत असल्याचे शिबिरांमध्ये निष्पन्न होत आहे." - अभिनव मुंदडा, नेत्रतज्ज्ञ, आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर

डिजिटल लाॅकडाऊन संकल्पना

विद्यार्थ्यांसह पालकांनी आता डिजिटल लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असून, दररोज सायंकाळी सात ते नऊपर्यंत घरात मोबाईल व टीव्हीचा वापर पूर्णपणे बंद करावा व दर रविवारी मुलांना मोबाईल व टीव्ही न पाहू देता मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यावा.

मुले ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली पालकांकडे मोबाईलची मागणी करतात. आता शाळा ऑफलाइन सुरू असल्याने शिक्षकांनी देखील गरजेशिवाय ऑनलाइन अभ्यास देणे टाळल्यास मुले लवकरच डोळ्यांच्या या सर्व समस्यांमधून बाहेर येतील, अशी संकल्पना प्रा. भूषण बिरारी यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT