Forest ranger Dattatray Londhe, Forest Guard Akshay More, Police Patil Mahadev Zalte, Yogesh Borse etc. came to question the youth who was injured in the leopard attack at the district hospital. esakal
जळगाव

Jalgaon Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Leopard News : येथून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.२) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या तरुणाने वेळीच आरडाओरड केल्याने तो थोडक्यात बचावला.(Farmer injured in leopard attack jalgaon news)

पिंप्राळा (ता. मुक्ताईनगर) येथील गणेश गणपत झाल्टे (वय ३४) हा तरुण शेतकरी शनिवारी (ता. २) आपल्या पिंप्राळा शेतीशिवारात गट क्रमांक १६२ मधील शेतात शेळ्या चराई करीत असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक बिबट्याने तरुणावर हल्ला केला. हल्ला करताच तरुणाने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली असता बिबट्याने त्याला सोडले.

ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूस असलेले शेतकरी धावून आले. तोपर्यंत बिबट्या शेताजवळच असलेल्या वनखंड ५७४ मध्ये असलेल्या वन विभागाच्या बंदीत निघून गेला. जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला शेतकऱ्यांनी ताबडतोब कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भावना मराठे, वनपाल डी. जी. पाचपांडे, वनरक्षक अक्षय मोरे, वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे, राम आसुरे, वनरक्षक स्वप्नील गोसावी, योगेश बोरसे यांच्यासह पोलिस पाटील महादेव झाल्टे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जखमीला कुऱ्हा येथे औषधोपचार करून तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल नेले.

तेथून जळगाव जिल्हा रूग्णालयात नेऊन तेथे उपचार करण्यात आले. या वेळी पिंप्राळा सरपंच रामचंद्र कोळी, पोलिस पाटील महादेव झाल्टे, प्रमोद झाल्टे, जखमीचे वडील गणपत झाल्टे, भाऊ अमोल झाल्टे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय वन क्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांनी जखमीची विचारपूस करून पाहणी केली.

यावेळी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीची पाहणी करून औषधोपचार केले आणि पुढील उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यास सांगून डिस्चार्ज दिला. या तरुणावर बिबट्याने उजवा हात आणि खांद्यावर गंभीर दात मारून जखम केली असून, पोटावर पंजाने ओरखडले आहे. दरम्यान, या थरारक हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

''पूर्णा नदीचा काठ असल्याने या शिवारात वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे दुकटे जाऊ नये. हातात लाठी, काठी घेऊन जावी. रात्रीचे जाणे टाळावे आणि वन विभागाला सहकार्य करावे.''- दत्तात्रय लोंढे, प्रभारी वनक्षेत्रपाल, वढोदा वनपरीक्षेत्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT