MLA Kishore Patil, former MLA Dilip Wagh, Ganesh Patil, Prakash Patil on the felicitation of the unopposed elected directors of Shetkari Sangh. esakal
जळगाव

Jalgaon News : पाचोरा शेतकी संघ निवडणुकीत आजी - माजी आमदार एकत्र

शेतकरी सहकारी संघाच्या २०२३ ते २८ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी येथे ४ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ एकत्र आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शेतकरी सहकारी संघाच्या २०२३ ते २८ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी येथे ४ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ एकत्र आले असून, त्यांच्या सहकार पॅनलच्या ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. (Former MLAs together in Pachora for shetki Sangh elections jalgaon news)

उर्वरित सर्वच्या सर्व १५ जागा बिनविरोध होतील अथवा एक, दोन जागांसाठी मतदान झाले तरी सर्व जागा जिंकण्याचा निर्धार संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. १९) दुपारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील.

शेतकी संघाचे माजी चेअरमन प्रकाश निकुंभ, एन. सी. पाटील, शिवदास पाटील, रणजीत पाटील, हर्षल पाटील (भडगाव), रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, नंदू पाटील, चंद्रकांत धनवडे, प्रकाश तांबे, रणजित पाटील, विशाल पाटील, ॲड. अविनाश सुतार आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार किशोर पाटील व दिलीप वाघ यांनी शेतकी संघाची गतकाळातील वैभवशाली स्थिती व सध्याची आर्थिक दुरवस्था या संदर्भात स्पष्टीकरण देऊन शेती संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणूक होणे अयोग्य वाटत असल्याने आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.

सहकारात पक्षीय राजकारण नसावे. एकूण ६३ उमेदवारी अर्ज असून, आतापर्यंत १२ उमेदवारांची माघार झालेली आहे. २४ जानेवारीला माघारीच्या मुदतीनंतर चित्र स्पष्ट होईल.

शिवसेना ठाकरे गट व भाजप यांचे काही उमेदवारी अर्ज असून, शिंदे लिमिटेड भाजप व्यतिरिक्त भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी समक्ष येऊन भूमिका मांडली तर त्यांनाही जागा देण्याचा विचार करू.

तालुक्यात भाजपचे सहकार क्षेत्रात कोणतेही वर्चस्व नसल्याचे सांगून विरोधकांकडून कारण समज, गैरसमज पसरवून दिशाभूल केली जात असली तरी मतदार जागृत आहेत तेच विरोधकांना धडा शिकवतील, असे स्पष्ट केले.

सर्वच्या सर्व जागा बिनविरोध निवडून येतील. एक, दोन जागांसाठी मतदान झाले तरी आम्हालाच निर्विवाद बहुमत मिळेल, असा विश्वास आजी, माजी आमदारांनी व्यक्त केला.

शेतकरी संघाच्या जागा मालकांशी असलेला करार संपल्याने त्यांनी जागा विक्री केली असून, नवीन साडेतीन एकर जागा संघाने खरेदी केली आहे.

आणखी जागा घेण्याचे नियोजन असून, येत्या पाच वर्षांत शेतकरी संघाच्या नव्या जागेत पेट्रोल पंप, गोदाम, मंगल कार्यालय, कृषी केंद्र असे विविध व्यवसाय सुरू करून संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आजी,माजी आमदारांनी दिली.

बिनविरोध निवडून आलेल्या फकिरा बुधा चांभार (वरखेडी), सुरेखा श्रीकांत पाटील (शिंदाड) व अरुणा राजेंद्र पाटील ( खाजोळा ) या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.

गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT