Jalgaon: Collector Aman Mittal speaking at the meeting held at the Collectorate. Neighbor MLA Eknath Khadse, Gulabrao Devkar, MLA Anil Patil, Superintendent of Police M. Rajkumar, MLA Kishore Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : कपाशीला अनुदान, कांद्याला भाव द्या!; खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कपाशीला भाव मिळत नसल्याने शासनाने कपाशीला अनुदान द्यावे, कांद्याला हमीभाव द्यावा, जिल्ह्यात जुगार, मटका सुरू आहे.

त्यावर कारवाई करावी, नदीपात्रातून वाळूचोरी रोखण्यासाठी प्रतिबंध करावा, बोदवड, वरणगावचा पाणीप्रश्‍न सोडवावा आदी मागण्यांसाठी सोमवारी आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे, उमेश नेमाडे, अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.(Give Subsidy for cotton and price for onion NCP along with Gods stayed with district collector Jalgaon News)

जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी राष्ट्रवादीतर्फे विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कापूस, कांदा प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील उपस्थित होते.

पाणीप्रश्‍नासह इतर प्रश्न १५ दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, कापूस, कांद्याच्या प्रश्‍नाबाबत आमदार खडसे यांनी आमदार किशोर पाटील यांना मुख्यमंत्र्यांना फोन करून माझे बोलणे करून द्या, अशी भूमिका मांडली.

अर्धा तास आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावायचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागला नाही. यामुळे सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी जळगावला येत आहेत. त्यांच्याशी बोलणे करून कापूस, कांदा प्रश्‍नाबाबत माहिती देईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्याने बैठक संपविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळा बंद ठेवून, कुटुंबासह कार्यक्रमाला या

माजी मंत्री खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, की महापालिकेच्या आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन कुटुंबीयांसह ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहा, शाळा बंद ठेवा, मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गणवेश घालून, आयकार्ड घालून कार्यक्रमाला येण्याचे फर्मान काढले आहे.

...तर रेशन देणार नाही

रोहिणी खडसे यांनी व्हॉट्सॲपवर आलेला संदेश वाचून दाखविला. एका रेशन दुकानदाराने सर्व रेशनकार्ड धारकांना मेसेज पाठविला आहे. मुख्यमंत्री २७ जूनला जळगावला येत आहेत. रेशन कार्डधारकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, अन्यथा पुढील चार ते पाच महिन्यांचे रेशन मिळणार नाही, असे व्हॉट्‌सॲपवर आलेल्या संदेशमध्ये म्हटले असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

वरील मुद्यांवरून सर्वांनीच जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत या कार्यक्रमाला येण्याची सक्ती नागरिकांना केली जात आहे. शासन स्थानिक लहान प्रश्न सोडवित नाही अन्‌ नागरिकांना आपल्या दारी बोलवितो. वास्तविक नागरिकांच्या घरी जाऊन लाभ देणारे शासन हवे, असे त्यांनी सांगितले.

सक्ती केलेली नाही : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकार मित्तल म्हणाले, की या कार्यक्रमाला येण्याची कोणावरही सक्ती केलेली नाही. शाळा बंद ठेवून कार्यक्रमाला या, असेही कोणालाही सांगितलेले नाही. रेशन धान्य मिळणार नाही, असेही नाही.

याप्रकरणी नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. वरील आदेश काढणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना रद्द केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT