Strike
Strike esakal
जळगाव

Jalgaon News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर जाणार; जिल्हा बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी पुढील महिन्यात संपावर जाणार आहेत. त्यासाठी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटनेची सभा रविवारी (ता. ५) झाली. जिल्हाध्यक्ष मगन पाटील अध्यक्षस्थानी होते.(Government employees will go on strike next month for various demands including implementation of old pension scheme jalgaon news)

संघटनेच्या कार्यालयात झालेल्या सभेस सरचिटणीस अमर परदेशी, लढाप्रमुख महेंद्र सोनवणे, शेख नूर, बंडू सोनार, दीपक गोहील, विलास पाटील, गोविंदा पाटील, लक्ष्मण काकडे, गिरीश बाविस्कर, राकेश जाधव, घनश्‍याम चौधरी आदी उपस्थित होते.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने यापूर्वीच सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी कर्मचारी, फिक्स पे, सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी वर्ग ‘ड’ कर्मचारी महासंघ व शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक घेऊन त्यांच्या सहभागाने राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शाखेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ठराव करण्यात आला. हा ठराव १२ फेब्रुवारीच्या नाशिकच्या बैठकीत सादर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT