Guardian Minister Gulabrao Patil and citizens with students while giving a statement to Tehsildar Mahendra Suryavanshi.  esakal
जळगाव

Gondgaon Crime Case : 2 दिवसात ‘त्या’ नराधमाचे घर पाडणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Gondgaon Crime Case : गोंडगाव येथील घटनेप्रकरणी खटल्याची ‘फास्टट्रॅक’ कोर्टात सुनावणी होणार असून यासाठी काम सुरू झाले आहे.

या दोन दिवसात ‘त्या’ नराधमाचे घर पाडण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे आयोजित मूक मोर्चाला संबोधित करताना सांगितले. (Guardian Minister Gulabrao Patil statement about Gondgaon Crime Case jalgaon news)

गोंडगाव (ता. भडगाव) येथील चिमुकल्या मुलीवर अतिप्रसंग करून तिला ठार मारणाऱ्या ‘त्या’ नराधमात तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हा गुन्हा ‘फास्टट्रॅक’ कोर्टात चालवावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. ८) येथील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. बजरंग चौकातून सकाळी दहाला मोर्चाला सुरुवात झाली.

तेथून धरणी चौक, कोट बाजार, परिहार चौक, शिवाजी महाराज चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यात विद्यार्थी- विद्यार्थिनींसह सर्वपक्षीय नेते व महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना विद्यार्थिनींनी निवेदन दिले. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की चिमुकलीला एका महिन्यात न्याय दिला जाईल.

‘त्या’ नराधमास फाशी झाली पाहिजे अशी मागणी आपण करणार आहोत. त्याचे घर दोन दिवसांत पाडले जाईल. अशी घटना घडू नये, यासाठी आई-वडिलांनी देखील काळजी घ्यावी. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून एका महिन्यात न्याय देऊ असे आश्‍वासन त्यांनी दिले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी गौरी पवार, कोमल मराठे, स्नेहा मराठे, धनश्री मराठे यांनी तीव्र शब्दांत संतप्त भावना व्यक्त करुन नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माजी नगराध्यक्षा अंजली विसावे व उषा वाघ यांनीही तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. कैलास माळी यांनी सूत्रसंचालन तर भाजपचे गुलाब मराठे यांनी आभार मानले.

मोर्चात जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, गोपाल चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, भानुदास विसावे, गजानन पाटील, डी. ओ. पाटील, रवींद्र कंखरे, भय्या महाजन, बाळू जाधव, धीरेंद्र पुरभे, वाल्मिक पाटील, रवी महाजन, सुनील चौधरी, सिताराम मराठे, वसंतराव बोलाणे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जानकीराम पाटील, जिल्हा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नीलेश चौधरी, गजानन महाजन, संतोष सोनवणे, प्रेमराज पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे, धनराज माळी, मोहन पाटील, ॲड. संजय महाजन, डी. आर. पाटील, वसंतराव भोलाणे, चंदन पाटील, दिलीप महाजन, कन्हय्या रायपूरकर, टोनी महाजन, ‘मनसे’चे शहराध्यक्ष फुलझाडे, मोर्चाचे आयोजक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष भरत मराठे, गुलाब मराठे, नामदेव मराठे, जयसिंग मराठे, दिलीप मराठे, भास्कर मराठे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: जुन्नरच्या दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६ मध्ये एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT