Guardian Minister Gulabrao Patil applying odor and book to the kirtans during the royal dinner.
Guardian Minister Gulabrao Patil applying odor and book to the kirtans during the royal dinner.  esakal
जळगाव

Gulabrao Patil News : जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार; गुलाबराव पाटील यांची किर्तनकारांना ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : अधिक महिन्याच्या पावन पर्वात जावई, ब्राह्मण व संत सज्जनांना सन्मानित करुन दान देण्याची परंपरा आहे. याच अधिक मासाचे औचित्य साधून राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातील किर्तनकारांना शाही भोजन दिले.

तसेच, त्यांना वाण म्हणून श्रीफळ, रूमाल व चांदीची गाय भेट दिले. जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. (Gulabrao Patil promise to Kirtankar about Varkari Bhavan will be constructed in district jalgaon news)

मंत्री पाटील यांचे भाषण अत्यंत खुमासदार असते. त्यात संताचे भजन, ओव्या व भारूड यांचेही दाखले ते देत असतात. संत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला आहे. त्याच भावनेतून राजकीय भूमिका बाजूला ठेवून त्यांनी संतसेवेच्या हेतुने अधिकमासाच्या पावनपर्वात आपल्या मतदार संघातील सर्व किर्तनकारांना पाळधी येथील सुगोकि सभागृहात शाही भोजन दिले.

एवढेच नव्हे तर स्वत:ही किर्तनकराप्रमाणे फेटा व उपरणे परिधान करून प्रत्येक किर्तनकाराच्या कपाळाला गंध, बुका लावून त्यांचे आर्शिवाद घेतले. किर्तनकारांना भोजनासाठी स्वतंत्र सुविधा करण्यात आली होती.

प्रत्येकाला चौरंग व त्यावर ताट ठेवण्यात आले होते. त्यांच्या डोक्यावर शाही छत्री होती. भोजन झाल्यावर प्रत्येक किर्तनकारास चांदीची गाय, श्रीफळ व रूमाल अधिक मासाचे वाण म्हणून देण्यात आले.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, वारकरी संप्रदायाशी आपली‎ पहिल्यापासून नाळ जुळलेली‎ आहे. या माध्यमातून आपल्याला‎ कायम उर्जा मिळत असते.‎ वारकरी तत्वज्ञान हे खऱ्या अर्थाने‎ समाजाला दिशादर्शक आहे. वारकरी संप्रदायाचा‎ विचार हाच समाजाला तारू‎ शकतो. म्हणूनच ‎पांडुरंगाच्या अधिष्ठानाशिवाय जीवनास प्राप्ती नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।

तरी माझ्या दैवा पार नाही।।’

अशा संतवचनाचा उल्लेखही त्यांनी केला. या वेळी मतदार संघातील प्रत्येक गावात पखवाज, टाळ, वीणा, हार्मोनियम असे भजनी साहित्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील व त्यांचे पूत्र प्रताप पाटील यांनी केलेल्या या सत्काराने किर्तनकार भारावले आहेत.

प्रथमच एखाद्या मंत्र्यांनी आमचा यथोचित सत्कार केल्याचे त्यांनी म्हटले. रूपचंद महाराज, शारंगधर महाराज, पांडुरंग महाराज आवारकर, ईश्‍वरलाल महाराज पाळधीकर, देवगोपाल शास्त्री महाराज (आडगाव), गोविंद महाराज पाचोरेकर, समाधान महाराज भोजेकर यांच्यासह शेकडो किर्तनकार या वेळी आवर्जून उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, धनराज कासट, अरूण पाटील, प्रशांत झवर, चंदन कळमकर, भाऊसाहेब गुलाबराव पाटील फांउडेशन व प्रतापराव पाटील मित्र परिवाराने संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT