Jalgaon: After saving the youth's life, the founder Dr. Girish Thakur etc. esakal
जळगाव

Jalgaon Gmc News : अर्धमेल्या अवस्थेतील युवकाचे वैद्यकीय पथकाने वाचविले प्राण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बेदम मारहाणीमुळे अर्धमेल्या अवस्थेत उपचारासाठी आलेल्या जामनेर तालुक्यातील तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.

त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले होते. वैद्यकीय पथकाचे कौतुक केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते तरुणाला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. (half dead of a youth medical team saved life young man from Jamner taluka gets relief in GMC Jalgaon News)

नेरी (ता. जामनेर) येथील राहुल विश्‍वास निगडे (वय २९) याला बेदम मारहाणीमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील वैद्यकीय पथकाने त्याची स्थिती पाहून त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले होते.

जड व टणक वस्तूने मारहाण झाल्यामुळे दोन्ही हातांच्या कोपऱ्यापासून खाली, दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर झालेले होते.

तसेच, उजवा सांधा निखळला होता. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आधी रक्ताच्या ५ थैल्या चढविण्यात आल्या. त्यानंतर ५ दिवसांनी प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला जनरल कक्षात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथे रुग्णाच्या दोन्ही हातांचे आणि उजव्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. औषधोपचार करून २५ दिवसांनंतर त्याला नुकताच रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. ठाकूर, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक शेजवळ यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.

अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. अंकित गावरी, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समरुतवार, डॉ. सचिन वाहेकर, इन्चार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल, नीला जोशी, पॅथॉलॉजी विभागाने सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT