hotel owner killed waiter by hitting on head with an iron object Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : हॉटेल मालकानेच वेटरचा काढला काटा; 3 महिन्यानंतर असा झाला खुनाचा उलगडा...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्या वर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आला आहे.

नरेंद्र चौधरी याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई व रुपाली हॉटेल असून, दगडू पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होता. (hotel owner killed waiter by hitting on head with an iron object Jalgaon Crime News)

हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिलला अमळनेर पोलिस ठाण्यात खबर दिली की सकाळी सहाला हॉटेलकडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते.

तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. सहा मेस त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. चौधरी याने अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मात्र सुरत येथील अहवाल, दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनास्थळाजवळील फुटेज तपासले असता २२ रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सीसीटीव्हीतून हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मृताचे नाव असून, नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५, रा. माळीवाडा) असे संशयिताचे नाव आहे.

दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला.

त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस घनश्याम अशोक पवार याच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी (वय ३५, रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT