Crime News
Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पत्नी नांदायला येत नसल्याने नवऱ्याचा कारनामा; भावाचेच केले अपहरण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : साकोरा (ता. नांदगाव) येथील रहिवासी असलेल्या धनराज पाटील याने पत्नी नांदायला येत नाही म्हणून सात वर्षीय शालकाचे लग्न समारंभातून अपहरण केले.

अखेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे धनराजसह त्याचा अल्पवयीन शालक मनमाड येथे पोलिसांच्या हाती लागला असून, धनराजला अटक करण्यात आली अल्पवयीन शालकास त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. (husband kidnapped her brother due to wife not coming home jalgaon crime news)

नगरदेवळा सीम (ता. पाचोरा) येथील सासर असलेल्या धनराज पाटीलची पत्नी गेल्या महिन्यापासून माहेरी असून, ती सासरी येत नसल्याने तिला घाबरवण्यासाठी धनराजने शालकाचेच अपहरण करण्याचा प्लॅन आखला.

पाचोरा येथील रामानंदनगरात २९ मेस नातलगाच्या विवाह सोहळ्यासाठी पत्नीचा सातवर्षीय भाऊ आलेला असताना धनराजने या विवाह सोहळ्यातून त्याचे अपहरण करत पळवून नेले. विवाह सोहळ्यात हा मुलगा दिसत नसल्याने त्याचा शोध सुरू झाला. परंतु धनराजने त्याला सोबत नेल्याचे काहींनी सांगितल्याने धनराजच्या पत्नीने पाचोरा पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी धनराज पाटीलच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी धनराज व मुलाचा शोध घेण्यासाठी विश्वास देशमुख, अमोल पाटील या पोलिसांचे पथक तयार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी मुलाचा पाचोरा व साकोरा (नांदगाव) परिसरात शोध घेतला. परंतु दोघे मिळून आले नाहीत. धनराज त्याच्या घरीही दिसला नाही म्हणून धनराजच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी घेतले.

तो मनमाड येथे असल्याचे कळाल्याने पोलिसांनी मनमाड येथे जाऊन धनराज व मुलाचे फोटो तेथील रहिवाशांना दाखवत त्यांचा शोध घेतला असता धनराज व अल्पवयीन मुलगा मनमाडमधील एका गल्लीत फिरताना आढळले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पाचोरा येथे आणले. धनराजला अटक करण्यात आली असून, गौतम यास धनराजच्या पत्नीच्या म्हणजे मुलाच्या बहिणीच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी हरवलेल्या अल्पवयीन भावाला पाहून बहिणीने हुंदके देत त्याला मिठी मारली. त्यावेळी सारेच भावनिक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT