जळगाव

Jalgaon News : 9 वर्षांत वाचवले अडीच लाख रूग्णांचे प्राण; 108 रुग्णवाहिकेची जलद सेवा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ रुग्णवाहिकेमुळे नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. तर ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा रुग्णवाहिकेत जन्म झाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी '१०८' या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असता ही माहिती देण्यात आली. रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. (Lives of 2 lakh patients saved in 9 years by ambulance jalgaon news)

या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोचवावी‌ अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागास दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. राहुल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते.

कोरोनाकाळात मोठी मदत

कोरोना काळात देखील '१०८' रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या यात कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलिंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे.

कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून १ लाख १६ हजार ९१६ नॉनकोविड रुग्णांसाठी मार्च २०२० ते सप्टेंबर २०२३ दरम्यान सेवा बजावली आहे. विविध आजारांच्या ६४ हजार ४५८ रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.

रूग्णांना मिळाली संजीवनी

जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण, हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५ जळीत रुग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रुग्णांना सेवा मिळाली आहे.

अशी होते रुग्णवाहिका उपलब्ध

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT