Bus Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : मांजरोद-जळगाव एसटी बसचा अपघात

सकाळ वृत्तसेवा

धानोरा : येथील जळगाव रस्त्यावरील हॉटेल कलर गार्डनजवळील वळण रस्त्यावर गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेआठला बसचा अपघात झाला. मांजरोद जळगाव ही बस दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली.

यात वाहक व दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली असून ग्रामस्थांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. (Manjrod Jalgaon ST bus accident Bike driver rescued passengers injured Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

मांजरोद-जळगाव बस (एमएच १४ बीटी २३६४) चालकाने वळण रस्त्यावर दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावली. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. बसचा दरवाजा दबला गेल्याने प्रवाशांना संकटकालीन मार्गातून ग्रामस्थांनी बाहेर काढले.

बसमध्ये सतरा प्रवासी प्रवास करत होते. वाहक हेमंत पवार यांना पायाला मार लागला होता. त्यांना धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. उमेश कवडीवाले यांनी प्रथमोपचार केले. अपघात स्थळी एका खासगी डॉक्टरांनी जखमी प्रवाशांना मलमपट्टी केली.

दरम्यान बसमध्ये एक पेशंट डायलिसिससाठी जळगाव येथील दवाखान्यात आपल्या रुटीन चेकअपसाठी जात होते. मात्र, अपघात घडल्याने तो रुग्ण घाबरून गेला. त्या धक्क्यातून त्या प्रवाशाला सावरत प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून जळगाव जाण्यासाठी रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT