Lajinabi Khan with five-month-old Asad Khan. esakal
जळगाव

Jalgaon News : हृदयद्रावक! किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली अन् पोटाला 5 महिन्यांचे बाळ बांधून मातेची विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लासगाव (ता. पाचोरा) येथील माहेर व सासर असलेल्या अठरा वर्षीय विवाहितेने पोटाला पाच महिन्याचे गोंडस बाळ बांधून गावाजवळच्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (mother jumps into well with 5 month old baby tied to her stomach jalgaon news)

ही घटना मंगळवारी (ता. ३०) उघडकीस आली. या घटनेमुळे सारे गाव सुन्न झाले असून, विवाहितेने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

लासगाव येथील आरिफ खान या तरुणाचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लाजनाबी हिच्याशी झाला होता. त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाले. सर्व सुरळीत सुरू असताना कुटुंबात किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली असावी व त्यातून विवाहितेने पाच महिन्याच्या बाळासह विहिरीत आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, रविवारी (ता.२८) लासगाव येथेच समाजातील विवाह सोहळा असल्याने खान कुटुंबीयांना विवाहासाठी सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी आरिफ खान विवाह सोहळ्यासाठी निघाले. मी बाळाची तयारी करून त्याला सोबत आणते, तुम्ही पुढे चला, असे लाजीनाबीने सांगितल्याने आरिफ खान आई- वडिलांसोबत विवाह सोहळ्यासाठी गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु बराच वेळ झाला, तरी लाजीनाबी विवाह स्थळी न आल्याने आरिफ खान त्यांना पाहण्यासाठी घरी गेले असता घर बंद दिसले. पत्नी लाजीनाबी घरीही नाही व विवाहाच्या ठिकाणीही नाही हे पाहून गावातील काही नातलगांकडे त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु ते आढळून न आल्याने आरिफ खान यांनी २८ ला सायंकाळी पाचोरा पोलिस ठाण्यात येऊन पाच महिन्याच्या मुलासह पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी हरवल्याची नोंद करून या विवाहितेचा शोध सुरू केला असता मंगळवारी (ता. ३०) गावालगतच्या शेतशिवारात लाजिनाबीसह पाच महिन्याच्या असदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही घटना पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस कर्मचारी मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघ, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. लाजीनाबीने गोंडस बाळासह आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? याबाबत तर्कवितर्क केले जात असून, खऱ्या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, आरिफ खानच्या दारूच्या व्यसनामुळे पती, पत्नीत वादविवाद होत असल्याची चर्चा घटनास्थळी दबक्या आवाजात कानी पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT