Pachora: District President Ravindra Patil giving appointment letter to newly appointed Bhadgaon Taluka President Kunal Patil in the review meeting of Nationalist Youth Congress. Officials like Dilip Wagh, Sanjay Wagh, Vikas Patil, Harshal Patil etc
Pachora: District President Ravindra Patil giving appointment letter to newly appointed Bhadgaon Taluka President Kunal Patil in the review meeting of Nationalist Youth Congress. Officials like Dilip Wagh, Sanjay Wagh, Vikas Patil, Harshal Patil etc esakal
जळगाव

Jalgaon News : महामार्गाच्या दुर्दशेबाबत राष्ट्रवादीचा ‘एल्गार’

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : भुसावळ ते चांदवड दरम्यान नुकत्याच करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची जळगाव ते चाळीसगाव दरम्यान कमालीची दुर्दशा झाली असून, हा मार्ग नित्याच्या अपघात व हानीमुळे ‘मौत का कुवा’ बनला आहे.

या मार्गाच्या दुर्दशेसंदर्भात व दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एल्गार पुकारला असून, मंगळवारी (ता. ७) पाचोरा येथे पाचोरा व भडगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत या आंदोलनाचा निर्धार करण्यात आला.

दुरुस्तीबाबत २० फेब्रुवारीपर्यंत ‘अल्टिमेटम’ देण्यात आला असून, २१ फेब्रुवारीस सकाळी दहापासून नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव या ठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. (NCP Action about plight of highway Nationalist youth review meeting decision Rasta Roko on 21st at various places Jalgaon News)

पाचोरा व भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मंगळवारी (ता. ७) दुपारी माजी आमदार तथा जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

याप्रसंगी दिलीप वाघ, संजय वाघ, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, भूषण वाघ, भडगावचे राहुल पाटील, व्ही. एस. पाटील, कुणाल पाटील, हर्षल पाटील, अरुण सोनवणे, विवेक पवार, प्रकाश भोसले, शशिकांत चंदिले, सुदर्शन सोनवणे, रणजित पाटील, ॲड. अविनाश सुतार, विश्वनाथ पाटील, अरुण सोनवणे, भूषण पाटील, प्रदीप वाघ, गौरव पाटील, सागर कुमावत, गौरव शिरसाठ या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

याप्रसंगी पक्ष बांधणी, पक्ष संघटन, गाव तेथे शाखा, गाव तिथे फलक, वन बूथ टेन यूथ, आगामी निवडणुका, युवकांची जबाबदारी या विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील जनतेसाठी पायाभूत स्वरूपाची कामे करावीत, राष्ट्रवादी पक्षाची समाजोपयोगी ध्येयधोरणे जनतेत रुजवावी, असे आवाहन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी कुणाल पाटील यांना नियुक्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय वाघ, विकास पाटील, हर्षल पाटील, दिलीप वाघ, रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.

महामार्ग दुर्दशेबाबत एल्गार

भुसावळ ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव ते चाळीसगाव दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण असून, मोठमोठे खड्डे पडून हे खड्डे दिवसागणिक वाढत आहेत. अपघात व हानी नित्याची झाली असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. उर्वरित रस्त्याची कामे त्वरित करावी, अशी अनेकदा मागणी केली. परंतु कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनांची दुर्दशा होत असून, वाहन चालकांनाही अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. निष्पापांना जीव गमावा लागत असल्याने यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा निर्णय झाला.

..यांच्या नेतृत्वात आंदोलन

नांद्रा येथे नितीन तावडे यांच्या नेतृत्वाखाली. पाचोरा येथे दिलीप वाघ, भडगाव येथे संजय वाघ, नगरदेवळा येथे अभिजित पवार तर कजगाव येथे राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले.

यासंदर्भातील निवेदने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक पाचोरा व भडगाव यांना देण्यात आली असून, या रास्तारोको आंदोलनात परिसरातील वाहन चालक, शेतकरी, नागरिक यांच्यासह ‘मविआ’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिलीप वाघ यांनी केले. हर्षल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचलन केले. अजहर खान यांनी आभार मानले.

एकमुखी निर्णय

येत्या २० फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी, भूमी संपादनासाठी जो रस्ता अपूर्ण सोडला आहे, तेथे निकाल लागेपर्यंत निदान डांबरीकरण करावे व रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी. अन्यथा २१ फेब्रुवारीस सकाळी दहापासून विविध पाच ठिकाणी रास्ता रोको करण्याचा एकमुखी निर्णय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT