Pachora Agricultural Produce Market Committee  esakal
जळगाव

Pachora Market Committee Election : पाचोरा येथे तिरंगी लढतीचे संकेत; युती-आघाडीचे गणित जुळेना

सकाळ वृत्तसेवा

Pachora Market Committee Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या २८ एप्रिलला मतदान व ३० ला मतमोजणी होणार आहे. (Pachora Market Committee Election Voting will be held on April 28 and counting on April 30 jalgaon news)

उमेदवारी अर्ज छाननीप्रसंगी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता १८ जागांसाठी २३१ उमेदवारी अर्ज शिल्लक असून, २० ला उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज छाननीत सहकारी संस्था मतदारसंघातील अनंतराव मोतीराम पाटील यांचा तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून अनिता दगडू पाटील व ग्रामपंचायत अनुसूचित जातीजमाती मतदारसंघातील रमाबाई कौतिक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज थकबाकी, जात प्रमाणपत्र दाखला या कारणावरून अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे आता २३१ उमेदवारी अर्ज असून, येत्या २० एप्रिलला माघारीची शेवटची मुदत आहे. त्यानंतर या निवडणुकीचे व लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचे स्पष्ट करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

स्थानिक पातळीवरील युती, आघाडीच्या नेत्यांमधील विकोपाला गेलेले मतभेद पाहतात युती व आघाडी धर्म पाळला जाईल याची शक्यता वाटत नाही. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ व काही भाजपचे पदाधिकारी या निवडणुकीत एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी, भाजपचे अमोल शिंदे व काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले आहे. माघारी नंतर कोण कोणाजवळ येऊन हातमिळवणी करतो व कशा लढती होतात? हे स्पष्ट होणार असले तरी तिरंगी लढत अटळ मानली जात आहे.

पाचोरा येथे आज सहकार मेळावा

पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून, २८ ला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सर्वच्या सर्व १८ जागांवर उमेदवार उभे केले असून, निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

प्रचारातही आघाडी घेतली आहे. बाजार समिती निवडणुकीसाठीच्या सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी (ता. ८) सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोंढाळा रस्त्यावरील तुळजाई जिनिंगमध्ये सहकार मेळावा होणार असून, आमदार किशोर पाटील हे मतदारांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Stomach Bloating: पोटफुगीची समस्या कशी कमी करावी? डॉक्टरांनी सांगितले 5 प्रभावी उपाय

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

SCROLL FOR NEXT