जळगाव

Jalgaon Crime News : भांडणातून घर जाळणाऱ्या एकाला 6 वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मागील भांडणाचा वाद डोक्यात ठेवून घराला आग लावणाऱ्या एकाला येथील न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी ः संशयित आरोपी देवेंद्र पांडुरंग पाटील (वय २४, रा. मोरयानगर, चाळीसगाव) याने फिर्यादी युवराज आधार पाटील (रा. पाटील गढी, चोपडा) यांच्या घरी पूर्वी झालेल्या पाहुण्यांचा वाद संगनमताने पोलिस ठाण्यात मिटल्यानंतरही तो वाद डोक्यात ठेवला होता. ( person who burnt down house due to fight was sentenced to 6 years jalgaon news)

त्यानंतर संशयित देवेंद्रने युवराज पाटील व त्यांच्या मुलाला धमकी देत, मुलगा प्रशांतची कॉलर पकडून मारहाण करून ‘तुमचे घर जाळून टाकेल’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो आपली बहीण व भाचीला घेऊन चाळीसगावला गेला होता.

२४ नोव्हेंबर २०२१ ला पहाटे चारच्या सुमारास युवराज पाटील हे घरात झोपलेले असताना घराच्या पहिल्या गॅलरीतून आरोपी देवेंद्रने घरात प्रवेश करून आतील लाकडी दरवाजा, पडदे, गॅस सिलिंडरवर डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्यात घर जळाल्याने नुकसान झाले होते. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे कामकाज न्यायालयात सुरू झाल्यावर तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्यासह इतर नऊ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. त्यानुसार, जिल्हा न्यायाधीश वर्ग- १ पी. आर. चौधरी यांनी आरोपी देवेंद्र पाटील याला वेगवेगळ्या कलमांमध्ये दोषी ठरवून सहा वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागूल यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

साडी नेसलेला सचिन जोरात ओरडला आणि रिक्षावाला घाबरला... निवेदिता यांनी सांगितला 'बनवाबनवी'च्या शूटिंगचा किस्सा

Latest Marathi News Live Update : ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार निवडणूका

Chakan Nagarparishad Election : कही खुशी, कही गम ! चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण

Manchar Nagarpanchyat Election : नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड; मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव

SCROLL FOR NEXT