fraud esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बँकेचा बोजा असलेल्या प्लॉट विक्रीतून फसवणूक; नाशिकच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बँकेचा ३५ लाखांचा बोजा असलेल्या प्लॉट विक्रीपोटी १० लाख ७५ हजार रुपये घेऊनही प्लॉट नावावर करून देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मानराज पार्कजवळील निशिगंधा अपार्टमेंटमधील रहिवासी सचिन चंद्रकांत शिरुडे यांची औषधांची एजन्सी आहे.

त्यांच्या नात्यातील नाशिक येथील कामटवाडा भागातील अभियंतानगरमधील रहिवासी अविनाश तुकाराम येवले यांच्याशी त्यांचे पूर्वी निकटचे संबंध होते. मे २०१७ मध्ये अविनाश येवले शिरुडे यांच्या घरी आले होते. (Plot sale fraud with bank burden Fraud of 10 lakhs Crime against Criminal of Nashik Jalgaon News)

त्यांनी नाशिक येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी गळ घातली. त्यांच्यावर विश्वास ठेवून ३० मे २०१७ ला सचिन शिरुडे त्यांच्या वडिलांसोबत नाशिक येथे गेले.

तेथे येवले यांनी त्यांना सिन्नर तालुक्यातील मानारी शिवारातील ३३२ वार क्षेत्रफळ असलेला प्लॉट दाखविला. शिरुडे यांनी राजेंद्र येवले यांच्या मध्यस्थीने हा प्लॉट खरेदीसाठी सहमती दर्शविली.

जळगावात झाला व्यवहार

प्लॉट घ्यायचे नक्की झाल्यानंतर सचिन शिरुडे यांनी जळगावात अविनाश येवले यांच्याशी चर्चा केल्यानुसार हा प्लॉट बोजाविरहित व बिनाजोखमीचा असून, ११ लाख ११ हजारांत या प्लॉटचा सौदा झाला. शिरुडे यांनी त्यासाठी ११ हजार बयाना रक्कम दिली. मात्र, त्याची कुठेही कागदोपत्री नोंद घेतली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१० लाखांची रक्कम येवलेंच्या खात्यात

प्लॉटच्या खरेदीसाठी उर्वरित पैसे वेळोवेळी सचिन शिरुडे यांनी आपल्या बँक खात्यातून सुमारे ९ लाख ४८ हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरून १ लाख २७ हजार, असे एकूण १० लाख ७५ हजार रुपये अविनाश येवले यांच्या खात्यावर पाठविले आहेत.

पैसे पाठविल्यानंतर शिरुडे यांनी प्लॉट खरेदी करून देण्यासाठी तगादा लावूनही अविनाश येवले यांनी प्लॉट खरेदी करून दिला नाही. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर सचिन शिरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत येवलेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, अविनाश येवले प्लॉट खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यातून शिरुडे यांना शंका आली. त्यांनी माहिती घेतली असता, या प्लॉटवर ९ नोव्हेंबर २०१७ ला बँकेचा ३५ लाखांचा बोजा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी पैसे परत करण्यासाठी २० जून २०२२ पर्यंतची मुदत दिली. तगादा लावल्यानंतर २५ एप्रिल २०२३ या तारखेचा धनादेशही दिला. तो धनादेश वटला नसून तो बँकेकडून परत आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : आजरा नगर पंचायतसाठी तिरंगी लढत

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT