Raver Toilet Scam : येथील पंचायत समितीतील टॉयलेट घोटाळ्यातील संशयित आरोपी मंजुश्री पवार यांची पोलिस कोठडी उद्या (ता. २६) संपत असून यानंतर तपासाला अधिक गती देत अन्य संशयितांनाही रडारवर घेणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (raver toilet scam Suspected accused Pawar police custody will end today jalgaon news)
या घोटाळ्यातील दुसऱ्या प्रमुख संशयित मंजुश्री पवार तब्बल १३ महिन्यानंतर पोलिसांना शरण आल्या होत्या. त्यांना अटक होऊन त्यांची पोलिस कोठडी उद्या (ता. २६) संपत आहे. त्यांच्याकडून आवश्यक ती सर्व माहिती मिळाली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यांनी यापूर्वीच ४ लाख २० हजार रुपयांचा भरणा पोलिसांकडे केला आहे.
त्याबाबतची माहिती उद्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या टॉयलेट घोटाळ्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांची बदली झाल्याने या प्रकरणाचा तपास नव्याने बदलून आलेले सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्याकडे आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत माहिती देताना त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की या घोटाळ्याचा आपण अभ्यास करीत असून लवकरच यातील आणखीन काही बड्या माशांवर कारवाई केली जाईल. या घोटाळ्यातील तपासासाठी आवश्यक अशी माहिती बँकांकडून देखील मागितली असून ती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
पोलिसांच्या या पवित्र्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या अन्य संशयितांचे धाबे दणाणले आहे. आता पुढे पोलिस काय कारवाई करतात? घोटाळ्यात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.