Animals sitting on the main road are creating such a hindrance to traffic  esakal
जळगाव

Stray Animal Problem : मोकाट जनावरांचे मालक कोण? अमळनेर पालिकेची यंत्रणा हतबल

सकाळ वृत्तसेवा

Stray Animal Problem : शहरातील रस्त्यांवर जनावरे मोकाट फिरत असून, ऐन वर्दळीच्या वेळी मुख्य रस्त्यावर ही जनावरे ठाण मांडून बसून असल्याने अपघाताला आमंत्रण देत असतात. या जनावरांचे मालक ठरवून या संपूर्ण समस्येला भिडण्याची गरज आहे. कदाचित या कामात फार काही हाती लागत नसल्याने पालिकेची यंत्रणा त्याबाबत उत्सुक दिसत नाही.

त्यामुळे मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर हा जीवघेणा खेळ सुरू आहे. दरम्यान, शहरातील पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाकडे ऑनलाइन नोंदणीत गाई १५५७ व म्हशी १३४० अशी २८९७ जनावरे आहेत. (stray animals sitting on main road invit accidents jalgaon news)

शहरातून जाणाऱ्या चोपडा-धुळे या मुख्य रस्त्यावर गुरांचे कळप नेहमीच बसलेले असतात. यामुळे यापूर्वीही लहान मोठे अपघात झालेले असून, कधी गुरांना इजा झाली आहे तर कधी मनुष्याला दुखापत झालेली आहे. पावसाळ्यात या समस्या जास्त उदभवत असल्याने यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे.

अनेक गुरे मालकांकडून आपली जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडली जातात, मात्र ती जनावरे मुख्य रस्त्यांवर येऊन अतिक्रमण करत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत असते. मुख्य रस्त्यासोबतच शहरातील इतर रस्ते व बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांची संख्या अधिक दिसून येते. पालिकेतर्फे या जनावरांसाठी कुठलीही व्यवस्था अथवा कोंडवाडा करण्यात आलेला नाही.

जबाबदारी निश्चित करा

मोकाट जनावरांचे मालक निश्चित केले पाहिजेत. त्यांच्यावर जबाबदारी देण्याची गरज असून, या प्राण्यांमुळे अपघात अथवा कुठलीही हानी झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेणेकरून जनावरांना मोकाट सोडले जाणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्वेक्षण होणे गरजेचे

शहरातील गुरांबरोबरच इतर पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. याच जोडीला भटक्या प्राण्यांचेही सर्वेक्षण करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून समोर येत आहे.

नियम काय सांगतो?

महाराष्ट्र पालिका कायद्यातील कलम १४-२२ (अ) उपकलम ३८६ नुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या राहत्या घरी कुठलाही प्राणी पाळायचा असेल तर त्या प्राण्याची नोंदणी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे.

केवळ कुत्रीच नव्हे तर परवानगी असलेला कोणताही प्राणी पाळण्यासाठी हा परवाना असणे गरजेचे आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राण्यांची कुठलीही नोंद नसल्याची माहिती मिळाली असून, पशुसंवर्धन तसेच पशुवैद्यकीय विभागाकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT