Eye Infection esakal
जळगाव

Eye Infection : चाळीसगावकर डोळ्यांच्या साथीने बेजार! शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लक्षणे; अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा

Eye Infection : तालुक्यात सध्या डोळे येण्याची साथ पसरली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचा संसर्ग दिसून येत आहे.

शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक असल्याने शाळा प्रशासन आणि पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (students are suffering from eye viral infection in chalisgaon jalgaon news)

डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे, ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोळे येण्याचे लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांनी शक्यतो तीन-चार दिवस शाळेत येऊ नये, अशा सूचना काही शाळांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या शालेय आरोग्य पथकाद्वारे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांशी संवाद साधून डोळे येणे, या आजाराविषयी मार्गदर्शन केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काय काळजी घ्यावी?

डोळे आले असतील, अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धूत राहावे. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा. कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे/सुरक्षित अंतर राखून राहावे.

कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ज्ञांचा/नेत्र रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर ५ ते ६ दिवसांत डोळे बरे होतात. शालेय विद्यार्थ्यांनी शक्यतो दोन-तीन दिवस शाळेत जाऊ नये.

"शालेय विद्यार्थ्यांमध्ये थोड्या प्रमाणात डोळे येण्याची लक्षणे आहेत. शालेय आरोग्य पथक विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन करत आहे. लक्षण असलेल्या विद्यार्थ्यांनी शक्यतो शाळेत जाऊ नये, जेणेकरून दुसरे विद्यार्थी बाधित होणार नाही." - डॉ. मंदार करंबळेकर, आरोग्य अधिकारी, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT