talathis will now have to give attendance schedule jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Talathi News : तलाठ्यांना आता उपस्थितीचे वेळापत्रक द्यावे लागणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Talathi News : जळगावसह राज्यात एका तलाठ्याकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक सज्जाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते कोणत्या दिवशी गावात येणार, याची माहिती गावकऱ्यांना नसल्याने विनाकारण त्यांना हेलपाटे मारावे लागतात.

त्यामुळे आता तलाठ्यांना नियोजित दौरा, बैठका व कार्यक्रमांची माहिती असलेले उपस्थिती वेळापत्रक ग्रामपंचायतीबाहेर दिसेल असे ठळकपणे लावण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. (talathis will now have to give attendance schedule jalgaon news)

तलाठ्यांची भरती प्रक्रिया सुरू असली, तरी ती पदे भरेपर्यंत तलाठ्यांकडे अनेक सज्जांचा कारभार राहणार आहे. राज्यात तलाठ्यांची १५ हजार ७४४ पदे मंजूर आहेत. त्यातील पाच हजार ३८ पदे रिक्त असून, आता चार हजार पदांची भरती सूरू आहे.

तलाठी हे नागरिकांसाठी महत्त्वाचे पद आहे. तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहात विविध प्रकारचे दाखले, उतारे देणे, जमिनीच्या नोंदी घेणे यासह पीक पाहणी, दुष्काळ, अतिवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत पंचनामे करण्यात त्यांची महत्वाची भुमिका असते.

असे असताना तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहात नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून शासनापर्यंत पोचल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून तलाठ्यांना त्यांचे रोजचे वेळापत्रक गावातील इतर शासकीय इमारतींवर, ग्रामपंचायतीत दर्शन भागात लावावे. तसेच, स्वत:बरोबरच मंडलाधिकारी, नायब तहसिलदारांचे मोबाईल क्रमांक टाकावेत, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

ठळक बाबी अशा....

* तलाठी भरती होईपर्यंत तलाठ्यांनी त्यांचे रोजचे नियोजन ग्रामपंचायतीसमोर लावावे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

* सज्जा कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासंबंधीचे वेळापत्रक निश्‍चित करून तेही लावावे

* स्वत:बरोबरच मंडलाधिकारी व तहसीलदारांचा दूरध्वनी क्रमांकदेखील त्याठिकाणी लावावा

* नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची प्रत्येक तलाठ्यांनी दक्षता घ्यावी

* शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची कामे मुदतीपेक्षा जास्त दिवस प्रलंबित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.

नागरिकांना करता येईल वरिष्ठांकडे तक्रार

तलाठी रोज सज्जाच्या ठिकाणी हजर राहत नसतील, आदेशानुसार वेळापत्रक लावत नसतील, तर नागरिकांना मंडलाधिकारी, नायब तहसीलदारांकडे तक्रार करता येईल. शेवटी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडेही जाता येईल. तत्पूर्वी, महसूल विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक तलाठ्यांना रोज त्यांचे वेळापत्रक (दौरा, बैठका) मंडलाधिकारी व नायब तहसीलदारांना पाठविण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT